|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आरोग्य क्षेत्रात गोवा ‘मॉडर्न’ आदर्श ठरणार

आरोग्य क्षेत्रात गोवा ‘मॉडर्न’ आदर्श ठरणार 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे उद्गार

प्रतिनिधी/ पणजी

 केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आज गोव्याला लाभ झाला आहे. गोवा राज्य हे शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रामध्ये आधुनिक करण्याचे सरकारचे ध्येय असून त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे ‘प्रधानमंत्री जनधन’ योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पायाभरणीचा कार्यक्रम काल मंगळवारी कला अकादमीत पार पडला.

 केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे मागील पाच वर्षात गोव्यात 25 हजार कोटींची विकास  कामे झाली आहेत, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद मोदी यांना जात आहे. त्यांच्यामुळे आज गोव्याला भरपूर निधी मिळत आहे. गोवा हे पंतप्रधानांसाठी आदर्श राज्य असून त्यांनी गोव्याला अनेक प्रकारे सहकार्य केले आहे. गोव्याचे एकूण उत्पन्न 6 हजार कोटी आहे असून पेंदाकडून 3.7 हजार कोटी रुपये मिळत असतात. यामुळे गोव्याचे एकूण उत्पन्न हे 10 हजार कोटीचे आहे. जर केंद सरकारचे सहकार्य मिळाले नसते तर आज गोव्यातील मोठमोठे पूल, रस्ते, हॉस्पिटल्स हे बांधणे शक्य झाले नसते, असेही यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा एकूण खर्च 386 कोटी

 आरोग्य क्षेत्राकडे गोवा सरकारने खास लक्ष केंद्रीत केले आहे. मडगाव येथे नवे हॉस्पिटल बांधले जाणार आहे. बांबोळी येथे 52 हजार चौरस मीटरमध्ये बांधण्यात येणाऱया या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा एकूण खर्च 386 कोटी आहे. यात 500 बेडसह अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत. याचा लाभ गोमंतकीयांना होणार आहे. तसेच लवकरच 44 कोटी खर्च करुन कर्करोग सुविधा केंद्र उभारले जाणार आहे. सध्या परराज्यातील लोकांसाठी आकारण्यात येणारे 20 टक्के शुल्क हे खूपच कमी आहे. यामुळे सरकारला 30 ते 40 लाख रुपये आतापर्यंत अर्थिंक लाभ झाला आहे. शुल्काबाबत आढावा घेण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 विपेत्यांना दिला इशारा…

 बांबोळी येथे रस्त्यावर जे विक्रेते आहेत, त्यांच्याकडून या परिसरामध्ये घाण केली जात आहे. त्यामुळे या लोकांनी त्याठिकाणी स्वच्छता ठेवावी, अन्यथा त्यांना त्या ठिकाणावरुन अन्य ठिकाणी हटविले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चांगली आरोग्य सेवा मिळणारः आरोग्यमंत्री

 या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. गोव्यातील लोकांना परराज्यात जाण्याची गरज भासणार नाही. बांबोळी येथील हॉस्पिटलचे डॉक्टर चांगले काम करत आहेत. हे हॉस्पिटल म्हणजे विकासाचा एक नमुना आहे. भारतातील हे चांगले व आधुनिक सेवेने परिपुर्ण असे हॉस्पिटल ठरणार आहे. यामुळे गोव्यातील आरोग्यसेवेत आणखी भर पडणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात सरकारचे मोठे पाऊल : सावईकर

 गोव्यातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी गोवा सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. या हॉस्पिटलचा खूप फायदा लोकांना होणार आहे. जर आमचे आरोग्य चांगले राहिले तर आमचा समाज निरोगी राहू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये जगातील सर्वात मोठी ‘आयुषमान भारत’ ही योजना सुरु केली आहे. देशातील 10 कोटी गरीब कुटुंबाना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. हे खूपच चांगले पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे, असे यावेळी दक्षिण गोव्याचे लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून भरपूर विकास : तेंडुलकर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशभरात अनेक विकासकामे केली आहेत. सबका साथ सबका विकास या योजनेप्रमाणे गोव्यात मागील पाच वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत, असे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

 सांत आंदेचे आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा व सातांप्रुझचे आमदार आंतानियो फर्नांडिस यांनी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलद्दल आनंद व्यक्त केला. ‘एचएससीसी’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश पांडय़े यांनी हे हॉस्पिटल कसे असणार आहे याची माहिती दिली. व्यासपीठावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदीप नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.

 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेवा

 हॉस्पिटलमध्ये अनेक आधुनिक सेवा पुरविल्या जाणार आहेत. यात इंडिक्रॉनोलॉजी, नॅप्रोलॉजी, युरोलॉजी, मेडिकल गॅस्ट्रइटरनोलॉजी, पेडिऍट्रिक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, नुरोसर्जरी, सीटीव्हीसी, कॉर्डिऑलॉजी व सर्जीकल गॅस्ट्रइटरनोलॉजी अशा विविध  आधुनिक सेवा लोकांना मिळणार आहेत.