|Monday, May 20, 2019
You are here: Home » Top News » वाढदिवसादिवशीच माजी आमदाराचे निधन

वाढदिवसादिवशीच माजी आमदाराचे निधन 

ऑनलाईन टीम / सांगली

  मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच निधन झाले आहे.

  मिरज मतदार संघातून सलग दोन वेळेस निवडून आलेले धत्तूरे निर्मळ प्रतीमेचे लोकप्रतीनिधी म्हणून प्रसिद्ध होते. आम जनतेच्या प्रश्नावर ते आवाज उठवत व ते वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते.

  हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री दीड वाजता त्यांचे निधन झाले. धत्तूरे हे 73 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

Related posts: