|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » पंतप्रधान रोजगार योजनेतील 88 टक्के अर्ज नामंजूर

पंतप्रधान रोजगार योजनेतील 88 टक्के अर्ज नामंजूर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2018-19 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार निर्मिती उपक्रमातून 7.5 लाख तरुणांना रोजगार देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र एप्रिल 2017 पासूनच्या आकडेवारीनुसार या योजनेंतर्गत करण्यात आलेले 88 टक्के अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आतापर्यंत 4 लाखपेक्षा अधिक तरुणांनी अर्ज केला असून केवळ 50 हजारांना कर्ज देण्यात आले.

एप्रिल 2017 पासून 13 फेबुवारीपर्यंत 4,03,988 तरुणांकडून कर्जासाठी अर्ज करण्यात आले होते. यापैकी 3,49,208 अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठविण्यात आले होते. जिल्हा पातळीवरील समित्यांनी 2,52,536 अर्जांना मंजुरी देत बँकांकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 49,721 अर्जांना बँकांकडून कर्ज देण्यात आले. प्रकल्पासाठी योग्य अहवाल नसणे व अर्ज पूर्ण नसल्याने फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले . चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी 1,024 कोटी रुपये, तर पुढील आर्थिक वर्षासाठी 1,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.