|Saturday, March 23, 2019
You are here: Home » leadingnews » बिहारच्या धर्मशाळेत बॉम्बस्फोट ; एक जखमी

बिहारच्या धर्मशाळेत बॉम्बस्फोट ; एक जखमी 

ऑनलाईन टीम / भोजपूर :

बिहारच्या भोजपूर जिह्यातील हरखेन कुमार जैन धर्मशाळेत आज सकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एकजण जखमी झाला असून सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पाच अतेरिकी या धर्मशाळेत आल्याची माहिती आहे. ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांनी धर्मशाळेत बॉम्ब ठेवतानाच त्याचा स्फोट झाल्याने त्यात एक अतिरेकी जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्याचे पाच साथीदार पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. धर्मशाळेत बॉम्बस्फोट झाल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बॉम्बविरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या तपास सुरू आहे.

 

 

Related posts: