|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर 

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबई महापालिकेत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या गटबाजीतून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना पक्षाने स्थायी समिती सदस्यत्त्व पदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समोर येत आहेत.

आशिष चेंबूरकर हे चार वेळा वरळीमधून निवडून आले तर मंगेश सातमकर हे सायन कोळीवाडय़ातून सलग तीन वेळा निवडून आलेत. गेल्यावषी शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सातमकर यांचे नाव चर्चेत आले होते. चेंबूरकर व सातमकर या दोघांनाही महापालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. चेंबूरकर व सातमकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मनसेमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पदावर वर्णी मिळत असल्याने सेनेमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील नव्या नियुक्तीवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडले होते. यावरून शिवसैनिकांनी पक्षाविरोधी पोस्टरबाजी केली होती.

Related posts: