|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » औषधांवर सवलत हीच खरी रुग्णांची सेवा

औषधांवर सवलत हीच खरी रुग्णांची सेवा 

वार्ताहर /निपाणी :

समाजात सेवाभावी वृत्तीने गरजूंची सेवा करण्याचे मार्ग अनेक असतात. फक्त चोखंदळपणे मार्ग स्वीकारण्याची तयारी हवी. मेडप्लस या औषध वितरण करणाऱया कंपनीने औषध वितरण करताना रुग्णांना सवलत व भेटवस्तू देण्याची सुरू केलेली योजना याचाच एक भाग आहे. सेवाभावी वृत्तीतून केली जाणारी ही रुग्णांची सेवा आहे, असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक सुभाष कदम यांनी केले.

येथील अशोकनगरात मेडप्लसच्या माध्यमातून प्रतिक पाटील अकोळ यांनी सुरू केलेल्या औषध दुकानात ग्राहक तथा रुग्णांना भेटवस्तू वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भेटवस्तू स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रारंभी रोहिणी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मेडप्लसच्या अभियानाची माहिती सांगताना रुग्णांना औषध खरेदीवर दिली जाणारी थेट सवलत व भेटवस्तू वितरणाची सविस्तर माहिती दिली.

कदम पुढे म्हणाले, मेडप्लसने सवलत योजना व भेटवस्तू वितरण राबवून रुग्णांचे हित जोपासत व्यावसायिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. धावपळीच्या युगात प्रत्येक घराघरात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे अशा रुग्णांवर उपचार घेताना औषधांचा खर्चही वाढत आहे. औषधांच्या वाढत्या किंमती सामान्य रुग्णांचे आर्थिक कंबरडे मोडत आहेत. पण यामध्ये मेडप्लस सवलती देऊन सामान्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. 24 तास सेवा देणारी ही संस्था निपाणी परिसरासाठी जीवनवाहिनी ठरत आहे, असे सांगितले. यावेळी प्रतिक शाह यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.