|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » व्हॉट्सऍप स्टेटसवरून मुलाची हत्या

व्हॉट्सऍप स्टेटसवरून मुलाची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे

पुण्यातील चाकणमध्ये 14 वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली असून, या हत्येचे कारणही चक्रावून टाकणारे आहे. अनिकेत शिंदे असे मृत मुलाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांसमोर एक भयानक सत्य समोर आले आहे. अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपचा एक ग्रुप तयार केला. पण काही दिवसांनी याच ग्रुपमधल्या सदस्यांचे मतभेद सुरू झाले. एकमेकांना हिणवण्यासाठी आपले स्टेटस बदलण्याचा सिलसिला सुरू झाला एकाने ‘द किंग’ असा स्वतःचा स्टेटस ठेवला. तर त्याला शह देण्यासाठी दुसऱयाने ‘आपणच बादशाह’ असा स्टेटस ठेवला. या वादातूनच ग्रुपमधल्या एका सदस्याने अनिकेतला कुत्रा असे संबोधले आणि वाद विकोपाला गेला.

याच वादातून चाकणच्या भुईकोट किल्ल्यात आमना-सामना करायचे ठरले आणि तिथेच दोघांची झटापट सुरु झाली. यातच एकाने अनिकेतला भोसकलं. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या ओंकार हा देखील गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आणखी पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

पण इतक्मया किरकोळ कारणावरून हत्या होत असेल, तर हे पालकांसाठीच नाही. तर समाजासाठी चिंतेची बाब आहे. समाजातले स्टेटस हे सोशल मीडियावरच्या स्टेटसवर अवलंबून नसते. हे कुणी तरी आपल्याला सांगण्याची वेळ आली आहे. व्हर्च्युअल गेम्समध्ये सहज एखाद्याला गोळी घातल्याप्रमाणे मुलांनी एकमेकांच्या जीवावर उठणे ही धोक्याची घंटा आहे.