|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विहिरीत पडून ऊसतोड मजुराचा मृत्यू

विहिरीत पडून ऊसतोड मजुराचा मृत्यू 

गळतगा क्रॉस नेजमार्गावरील घटना : सदलगा पोलि

वार्ताहर / बेडकिहाळ

विहिरीत पडून ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली. बेडकिहाळ येथील गळतगा क्रॉस परिसरातील नेज मार्गावर ही घटना घडली. भगवान रामा काटे (वय 45 रा. धावाजीचीवाडी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गळतगा-भोज क्रॉस परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. तेथे भगवान आपल्या टोळीसमवेत ऊसतोड करत होता. सायंकाळी 7 वाजता तो आपल्या वस्तीवर आला होता. त्यानंतर तो मित्रांसोबत भोज क्रॉसजवळील एका धाब्यावर जेवणासाठी गेला. मात्र रात्री तो वस्तीवर परत आला नाही. त्यामुळे पत्नीने भगवानचा परिसरात शोध घेतला. पण तो सापडला नाही.

पण वसतीशेजारीच असणाऱया विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्याने काटे कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. भगवान हा मद्यपान करत होता. मिळणारी मिळकत तो दारुवर खर्च करत होता. व्यसनापोटी त्याने गावाकडील शेतजमीनही विकली आहे. घटनास्थळी पत्नी सत्यभागा व त्याच्या मुलाला बोलावून ओळख पटवून घेण्यात आली. ओळख होताच पत्नी व मुलाने एकच हंबरडा फोडला. त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनास्थळी सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संगमेश दिडगीनहाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी ऊसतोड मजुरांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी सदलगा येथे पाठविण्यात आला. भगवान याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सात घटनेची नोंद : मृत