|Friday, February 22, 2019
You are here: Home » leadingnews » श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : संभाजीराजे

श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : संभाजीराजे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱया अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रात राहण्याचे अधिकार नसून त्याला हद्दपार करण्यात यावे,अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने शुक्रवारी नगर शहरासह जिह्यात प्रचंड जनक्षेप उसळला होता, पोलिसांनी छिंदमला रात्री अटक केली होती. न्यायालयाने छिंदमला 1 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर सबजेलमध्ये त्याला दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याला बडवल्याची माहिती समोर आली आहे. छिंदमच्या वक्तव्याचा खासदार संभाजीराजे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ‘शिवाजी महाराजांच्या बाबतीत असे वक्तव्य केल्यानंतर छिंदमला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही हक्क नाही.त्यामुळे त्याला राज्यातून तडीपार करावे, असे संभाजीराजे म्हणाले.

 

Related posts: