|Saturday, July 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

राजकीय -सामाजिक कार्याला योग्य दिशेने नेता येईल. लोकांच्या गरजा ओळखून त्यांना साहाय्य करा. अर्धवट राहिलेल्या योजना मार्गी लावा. धंद्यात जम बसेल. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. संसारात शुभ कार्याची सुरुवात होईल. भेटी होतील, नोकरीचा प्रश्न सुटेल. कला, क्रीडाक्षेत्रात चमकाल. अभूतपूर्व यश मिळेल. शैक्षणिक बाजू मजबूत होईल. प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल.


वृषभ

सप्ताहाच्या मध्यावर तुमच्या कामात अडथळे निर्माण होतील. राजकीय, सामाजिक कार्यात सर्वांच्या बरोबरीनेच काम करा. चुकीचा मार्ग पत्करू नका. प्रति÷ा टिकवता येईल. धंद्यात कष्ट घेतल्यावर फायदा वाढेल. शेतकरीवर्गाने परिस्थिती पाहून निर्णय ठरवावा. बुधवार, गुरुवार वाद वाढेल. नोकरांसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. संसारातील ताणतणाव मिटवता येईल. आपसातील दुरावा कमी होईल. कोर्टकेसमध्ये आशादायक परिस्थिती राहील. कला क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.


मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवता येईल. नवीन योजना तयार करा. लोकप्रियता मिळेल. शेतकरी वर्गाला फायदा होईल. शुक्रवार, शनिवार अडचणी येतील. संसारात समस्या कमी होतील. घर, वाहन, जमीन इ. खरेदीचा विचार करता येईल. शेअर्समध्ये लाभ मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात मोठय़ा लोकांचा परिचय होईल. नवे काम मिळेल. नोकरीत प्रगती होईल. शिक्षणात चांगले यश मिळेल. कोर्टकेस संपवा.


कर्क

या सप्ताहात तुम्हाला उत्साहावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नवीनच परिचय झालेल्या व्यक्तीशी कोणताही व्यवहार करणे धोक्मयाचे आहे. राजकीय, सामाजिक कार्यात भलत्या माणसाचा सल्ला घेऊन वाकडे पाऊल टाकू नका. अपमानास्पद घटना घडेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी लक्ष द्या. खाण्यापिण्याची काळजी घ्या. धंद्यात खर्च वाढेल. कामगारांची कमतरता राहील. मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. आप्तेष्ट मित्र यांच्यात तणाव होईल.


सिंह

सूर्य, चंद्र लाभयोग व शुक्र, नेपच्यून युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात सावध रहा. गुप्तशत्रूंचा भास होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. वरि÷ांच्याबरोबर एकसूत्रता राहील. धंद्यात काम मिळेल. थकबाकी वसूल करा. शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात मैत्री वाढेल. नावलौकीक होईल. शिक्षणात प्रगतीच्या दिशेने जाल. पती पत्नीमधील तणाव कमी होईल. शुभ समाचार मिळेल.


कन्या

 तुमचा उत्साह व आत्मविश्वास अति प्रमाणात वाढू देऊ नका. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्या योजनेला वरि÷ महत्त्व देतीलच असे समजू नका. तुमचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न होईल. घरातील वृद्ध क्यक्तीची काळजी वाटेल. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनाने समस्या वाढू शकते. धंद्यात अडथळे येतील. कामगार वर्गाशी वाद होईल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. कोर्टकेसमध्ये  सांभाळून वार्तालाप करा. नवीन ओळख झालेल्या माणसांवर एकदम विश्वास ठेऊ नका.


तुळ

नातलगांच्या कामासाठी व समारंभासाठी धावपळ होईल. भेटी झाल्याने उत्साह वाढेल. तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मान -सन्मान मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात  तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरि÷ मोठे काम देतील. कला-क्रीडा क्षेत्रात चांगली घटना घडेल. कोर्टकेसमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. थोरा मोठय़ांचे सहकार्य मिळेल. शिक्षणात आळस नको. कष्ट घ्या. मोठे यश मिळेल.


वृश्चिक

साडेसातीत माणसाला यश मिळते, तसेच विविध अनुभवसुद्धा मिळतात. त्यातूनच माणसाला शहाणपण मिळते. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकांचा सामना करता येईल. योजनापूर्तीसाठी प्रयत्न करा. धंद्यात  फायदा होईल. जास्त मोह नको. खर्चावर नियंत्रण ठेवा. मौज मजेत वेळ जाईल. महत्त्वाची कामे वेळेवर करा. संसारात तुम्हाला जबाबदारीने निर्णय घ्यावा लागेल. गैरसमज होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. विद्यार्थी वर्गाने जास्त अभ्यास करावा.


धनु

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. भेटीत व चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व सिद्ध करता येईल. लोकांचे सहाय्य मिळेल. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. प्रवासात घाई नको. प्रकृतीची वेळीच काळजी घ्या. सुधारणा होईल. संसारात सुखद घटना घडेल. विवाह ठरू शकतो. शेतकरी वर्गाच्या मालाला चांगला भाव मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. शिक्षणात प्रगती होईल.


मकर

या सप्ताहात प्रत्येक दिवस तुमच्या कामाचा असेल. जिद्द व प्रयत्न करून कठीण काम मार्गी लावण्याची तयारी ठेवा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा वाढेल. योजना पूर्ण करता येतील. कोर्टाच्या कामात यश मिळेल. थोरा मोठय़ांचे सहकार्य मिळेल. शेतकरी वर्गाला दिशा मिळेल. नुकसान भरून काढता येईल. धंद्यात जम बसेल. संसारातील समस्या सुटेल. गैरसमज दूर होऊ शकेल. शिक्षणात प्रगती होईल. नोकरी मिळेल.


कुंभ

राजकारणात मागील आठवडय़ात झालेले गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्याचा विकास होईल. स्वत:चे बाजूने लोकमत वळवता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील मुलांच्या प्रगती संबंधी योग्य तो विचार होईल. मौल्यवान खरेदी कराल. धंद्याला चांगली कलाटणी मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. केस जिंकाल.


मीन

कोणतेही कठीण काम करण्याची तुमची तयारी असली तरी  नम्रतेनेच प्रश्न सोडवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाबद्दल आक्षेप  घेतला जाईल. नोकरीत कामामध्ये चूक होऊ शकते. वरि÷ांच्या बरोबर वाद होईल. घरगुती वातावरण शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. धंद्यात खर्च वाढेल. घाई घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. पैसा गुंतवण्याचा उतावळेपणा नको. कोर्टकेसमध्ये अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये.