|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » केंद्र सरकारने त्यांना काठी देऊन सीमेवर पाठवावे : शरद पवार

केंद्र सरकारने त्यांना काठी देऊन सीमेवर पाठवावे : शरद पवार 

ऑनलाईन टीम / पंढरपूर

    केंद्र सरकारने आरएसएसच्या स्वयंसेवकांना हाफ पँट-शर्ट घालून आणि काठी देऊन देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे, म्हणजे भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे ते देशाला समजेल. अशी टीका ट्विटरद्वारे व पंढरपूरातील भाषणामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. पंढरपूरमध्ये बोलत असताना त्यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    काही दिवसा अगोदरच सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात प्रशिक्षित होतात. यांनी संघाच्या या प्रशिक्षण शिबीरा दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. सीमेवर लढणाऱया जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी सहा महिने लागतात. मात्र, संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात प्रशिक्षित होतात. वेळ पडली तर ते सीमेवरही जायला तयार आहेत. असे म्हणत, लष्कराविरोधात वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर मोहन भागवत यांनी देशाची माफी मागावी अशीही मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली होती. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपल्या प्राणपणाची बाजी लावतात. त्यांचा असा अपमान कदापिही सहन करण्यासारखा नाही. असेही काहींनी म्हटले. आरएसएसचे संचालक भागवत यांनी संघाच्या प्रशिक्षण शिबीरा दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले होते. तर भागवतांनी संघाच्या स्वयंसेवकांची तुलना ही सैनिकांशी नाही, देशातल्या जनतेशी केली होती, असे स्पष्टीकरण संघाने दिले होते. मात्र, ट्विटरद्वारे व पंढरपूरातील भाषणामध्ये शरद पवारांनीही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली. याचवेळी आपल्या भाषणात पवार यांनी नीरव मोदीचा अकरा हजार कोटींचा घोटाळा मोदी सरकारला माहिती होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली.