|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून निर्घृण हत्या

पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून निर्घृण हत्या 

ऑनलाईन टीम / नागपूर

   उपराजधानी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई व दीड वर्षाच्या मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे पत्रकारच नव्हे तर संपूर्ण नागपूर हादरून गेले आहे.

   याप्रकरणामुळे, नागपूरला ‘उपराजधानी’ म्हणायचे की ‘क्राईम सिटी’ असा प्रश्र निर्माण झाला आहे. नागपूरमध्ये एका न्यूज पोर्टल चालवणाऱया पत्रकाराच्या आई व दीड वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातून आता पत्रकारांच्या कुटुंबियांनाही गुन्हेगार निशाणा करत आहेत, असे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज रविवारी नागपूर-उमरेड रस्त्यावर आजी उषा कांबळ व नात राशी कांबळे यांचे मृतदेह सापडले आहेत. या दोघी काल संध्याकाळापासून बेपत्ता होत्या. या घटनेमागे घातपाताचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

   सुत्रांच्या माहितीनुसार, नागपूर-उमरेड रस्त्यावरील संजूबा हायस्कूलच्या मागील नाल्यात उषा कांबळे व नात राशी कांबळे यांचे मृतदेह पोत्यात भरुन फेकण्यात आले होते. यावेळी उषा कांबळे यांचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी चौकशी करत आहेत. एका पत्रकाराच्या कुटुंबाला असे संपवले जात असताना पोलीस मात्र बघण्याचीच भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शहरातल्या कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.