|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महाशिवरात्री उत्सवाची महाप्रसादाने सांगता

महाशिवरात्री उत्सवाची महाप्रसादाने सांगता 

वार्ताहर /निपाणी :

येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भव्य महाशिवरात्री व रथोत्सव सोहळय़ाची सांगता रविवारी महाप्रसाद वितरणाने झाली. यावेळी महाप्रसादाचे पूजन उपनगराध्यक्ष सुनील पाटील, महादेव मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, मंडळाचे सदस्य, भाविक यांच्या उपस्थितीत राजू नणदीमठ दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरहर महादेव।़।़।़चा गजर करण्यात आला. शहर व उपनगरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

महाशिवरात्री उत्सवाच्यानिमित्ताने 10 पासून मंदिरात दररोज शिवकीर्तन, पालखी व श्रीवाहन मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे श्री गणेश, उमा, महेश्वर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. खुल्या मॅरेथॉन, सायकल, रांगोळी, ग्रुप डान्स, फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धा पार पडल्या. तसेच विनोदी व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी रथोत्सव मिरवणूक पार पडली.

महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. महाप्रसाद वितरणासह उत्सव यशस्वी करण्यासाठी महादेव मंदिर ट्रस्ट, गणेश मंडळ, निलांबिका महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related posts: