|Sunday, August 25, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » अमोल यादवांची ‘गगन भरारी’ ;  महाराष्ट्रात उभा राहणार देशातील पहिला विमान कारखाना

अमोल यादवांची ‘गगन भरारी’ ;  महाराष्ट्रात उभा राहणार देशातील पहिला विमान कारखाना 

  ऑनलाईन टीम  / मुंबई

कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वप्नाला भरारी मिळाली आहे. अमोल यादव यांचे स्वदेशी विमान झेपवण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने पालघरमध्ये जागा दिली आहे. यासाठी अमोल यादव व राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटी रूपयांचा करार झाला आहे. त्यामुळे आता देशातील पहिला विमान कारखान महाराष्ट्रात उभा  राहणार आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.त्यामुळे अखेर अमोल यादव यांची प्रतीक्षा संपली आहे. आता राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करून जागेचा ताबा द्यावा.कारखान उभा करून त्यामध्ये पहिले विमान तयार  होण्याची प्रतीक्ष  आहे,असे अमोल यादव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

 भारतातील हा पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखान असेल,जो महाराष्ट्रात सुरू होत आहे.त्यामुळे राज्यासाठीही अभिमानाची बाब आहे. 20 नोव्हेंबर रोजीचे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव  यांच्या विमानाचे रजिस्ट्रेशन करून  घेतले होते.त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचे पत्र देण्यात आले होते.