|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरात शिवजंयती मिरवणुकीचा जल्लोष

शहरात शिवजंयती मिरवणुकीचा जल्लोष 

प्रतिनिधी /सोलापूर :

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने लेझीमचा ताफ्ढा, डॉल्बीचा दणदणाट, ढोलीबाजाच्या तालावर भव्य आणि दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने ही मिरवणूक जल्लोषपूर्ण व आकर्षक ठरली.

शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीस डांळिबीआड येथून सायंकाळी उत्साहात प्रारंभ झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, स्थायीचे माजी सभापती पद्माकर काळे, राजन जाधव, जगदीश पाटील, अर्जुन सुरवसे, विजय पुकाळे, विजय भोईटे, सहकारी शिखर बँकेचे अविनाश महागांवकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, मोहन डांगरे, दास शेळके, काँगेसचे धर्मा भोसले, सुनिल रसाळे, मध्यवर्तीचे अध्यक्ष रसूल पठाण, शेखर फ्ंढड, श्रीकांत घाडगे, दिलीप कोल्हे, निरंजन बोध्दूल यांच्यासह पदाधिकाऱयांची प्रमुख उपस्थिती होती.

    मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणूकीत सुमारे 23 मंडळाचा सहभाग होता. मोठय़ा उत्साही वातावरणात या मिरवणूकीस सुरूवात झाली. पुढे नवी पेठ, मॅकेनिक चौक, शिवाजी चौक, महात्मा गांधी मार्ग, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारूती, दत्त चौक मार्गे डाळिंबीआड येथे या मिरवणूकीचा रात्री समारोप झाला.