|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » विद्यापीठाच्या उपकुलसचिवाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

विद्यापीठाच्या उपकुलसचिवाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिवांनी तरूणाला नोकरीचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सहाय्यक कारकुन पदावर नोकरीला लावतो, असे आमिष दाखवत चिखलठाण्यातील देवनाथ चव्हाण यांना उपकुलसचिव ईश्वर मंझा यांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंझा व देवनाथ यांची भेट 2015 मध्ये झाली. त्यावेळी मंझा उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रात उपकुलसचिव पदावर कार्यरत होते. विद्यापीठात मोठय़ा प्रमाणात जागा निघणार आहेत. मी तुझे काम करू शकतो. असे आमिष दाखवून सहा लाख रूपयांची मागणी देवनाथ याच्याकडे केली. 2015 मध्ये ठरल्याप्रमाणे देवनाथ याने तीन लाख रूपये दिले. त्यानंतर देवनाथ चव्हाण व त्यांच्या भावाने उर्वरीत पैसे जमा केले आणि आर्डर कधी काढणार याची विचारणा केली असता, मंझा यांनी टाळाटाळ करत असल्याचा त्या दोघांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी सातारा येथून मंझा यांना अटक केली.