|Saturday, April 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

नशिबाची साथ असेल तरच यश… दुसरा भाग

बुध. दि.   फेब्रुवारी  2018

श्रीमंत लोक गरिबांची हेटाळणी करतात, हुषार व उच्चशिक्षित लोक स्वत:ला फार मोठे समजतात व कमी शिकलेल्यांना तुच्छ लेखतात. मोटरसायकल अथवा कारमधून जाणारे पायी जाणारे अथवा सायकलवरून जाणाऱयांना कमी लेखतात. त्यांचा दुस्वास करतात. साधे कपडे वापरणाऱयाला सुटाबुटातील लोक झुरळासमान मानतात. सायकल धरून माहित नसलेला माणूस विमानाने फिरतो. स्टेशनवर झोपून दिवस काढणारा स्वत:च्या कर्तृत्वाने जगात नाव काढतो, लहानपणी गरिबीमुळे हेटाळणारे लोक नंतर त्याची स्तुती करीत असलेले दिसतात, पण नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही. एकेकाळी विमान कंपनीचा मालक असणाऱयाकडे आज साधा पासपोर्टही नाही, पुण्याच्या कॉलेजचे माजी प्राध्यापक तसेच नासाने गौरविलेले सुवर्णपदक प्राप्त ऋषितुल्य  गुरुजी अनवाणी फिरतात, तरीही प्रचंड लोकप्रियता मिळवितात. व्यवसायात देखील पदोपदी याचा अनुभव येत असतो. डॉक्टर व्हायची इच्छा असलेली बेळगावची सुकन्या हवाई सुंदरी होते व लहान वयात विमानाने देशभर फिरते. काहीजण प्रामाणिकपणे व नि÷sने काम करीत असतात एक पैचाही भ्रष्टाचार त्यानी केलेला नसतो, संस्था वर येण्यासाठी ते सतत धडपडत असतात.पण अशा लोकांचा सत्कार कधीही होत नाही. अनेकजण कळकळीने मुलांना शिकवित असतात पण त्यांना कधीही आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळत नाही. देशासाठी अथवा समाजासाठी काहीही न  केलेल्यांना मात्र मोठमोठे पुरस्कार अथवा राज्यसभेचे सदस्यत्व वगैरे दिले जातात, वास्तविक पहाता सरकारमध्ये राहून काही तरी चांगले काम करणाऱयांना राज्यसभा अथवा लोकसभेत पाठवणे आवश्यक आहे. हे शोभेचे पुतळे निष्कारण जागा मात्र अडवून बसतात. नशिब जोरदार असेल तर कमी श्रमातही मोठे यश मिळू शकते. कर्माचा सिद्धांत हे तत्व इथे बरोबर लागू पडते. या जन्मातील अथवा पूर्वजन्मातील आपले अथवा आपल्या पूर्वजांचे कर्म जसे असेल त्यानुसार माणसाला यश किंवा अपयश मिळत असते. पूर्वजांच्या हातून नक्की काय चांगले वाईट घडलेले असते ते आपल्याला माहीत नसते, पण ज्यावेळी भगिरथ प्रयत्न करूनही यश मिळत नाही,लग्ने होत नाहीत, अचानक नोकरी सुटते किंवा संसार तुटतात, त्यावेळी कुठे तरी काही तरी चुकत आहे हे जाणवते. त्यासाठी कुणाच्या परिस्थितीची अथवा व्यंगाची कधीही टिंगल करू नये, ज्याचे जसे बरे वाईट प्राक्तन असते, त्यानुसार तो जगत असतो. हाती चार पैसे आले प्रसिद्धी मिळाली, चार चौघात नाव झाले की लोकांची वृत्ती बदलण्यास सुरुवात होते. ज्यांच्यामुळे आपण इतके वर आलो आहोत ज्यांनी मदत केली त्यांना हे लोक सोयिस्करपणे विसरतात व त्याच्या पाठीमागून त्याची टिंगलटवाळी सुरू करतात. असे चुकूनही करू नका. निसर्ग कुणावरही अन्याय करीत नाही. दैव कुणावर केव्हा कृपा करील अथवा केव्हा रुसेल ही साक्षात देवालाही सांगता येणार नाही.

 

मेष

आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. तसेच प्रवास वगैरेच्या बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. मंगळ प्रभावी आहे. जागेची महत्त्वाची व धाडसाची कामे करून घ्या. लिखाण, प्रवास, नातेसंबंध व मंगल कार्ये याबाबतीत चांगले यश मिळवाल. कर्ज देणे घेणे, नवी औषधे घेणे, महत्त्वाची गुंतवणूक वगैरे बाबतीत सावधानता न बाळगल्यास अडचणी उदभवतील.


वृषभ

आरोग्य सांभाळावे तसेच आर्थिक व्यवहार जपून करावेत. आर्थिक, शारीरिक व सामाजिक बाबतीत पथ्यपाणी व्यवस्थित ठेवल्यास कठीण आजार कायमचे दूर होतील. विनाकारण कुणीतरी प्रति÷sला धोका पोचविण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी आपले कोण व परके कोण हे ओळखून वागा. मंगळ बलवान आहे. न होणारी सर्व कामे वेगाने होऊ लागतील.


मिथुन

मित्र मंडळीकडून फसवणूक, खाण्यापिण्यातून मादक व गुंगीचे पदार्थ देणे, व्यसन लावणे व त्यातून स्वार्थ साधणे अशा घटना घडू शकतात. काळजी घ्यावी. वाहन जपून चालवावे. लक्ष्मीयोगाचा काळ महिनाभर आहे. या काळात आर्थिक लाभाचे काम करून घ्यावे. त्यापुढे अडचणी वाढतील. नोकरी क्यवसायात बदल करू शकाल. इतरांच्या चुकीमुळे नको त्या संकटात पडाल.


कर्क

अति दूरवरचे प्रवास शक्मयतो टाळा. नवे स्नेह जोडताना सावधगिरीने वागावे. तसेच नोकरी व्यवसायात सर्वांशी गोड बोलून काम करून घ्या. अचानक महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. घरगुती बाबतीत त्याचा परिणाम दिसून येईल. कर्क धनस्थानीत मंगळ लवकरच हटेल. त्यानंतर सर्व कामे अत्यंत वेगाने होऊ लागतील.


सिंह

आर्थिक शारीरिक व सामाजिक बाबतीत पथ्यपाणी व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण कुणीतरी प्रति÷sला धोका पोचविण्याचा प्रयत्न करतील. मतभेद संघर्ष, अति वेग इतर मार्गाने धनार्जन व जामिनकी यामुळे अडचणीत याल. सासरच्या बाबतीत संघर्षकारी वातावरण निर्माण होईल. सबुरीने वागणे आवश्यक.


कन्या

सर्व प्रकारचे मतभेद, फाजिल खर्च, गाडय़ांचा अती वेग तसेच व्यसने, कोणतेहें Qsंsंप्रश्न अचानक संकटे निर्माण करू शकतात. त्यासाठी सावध रहावे लागेल. मोबाईलमुळे वैवाहिक व सामाजिक जीवनात खळबळ माजू शकेल. त्यासाठी कुणालाही मोबाईल देताना सावध रहा. शुक्र काही बाबतीत  अतिरेकी वातावरण निर्माण करील.


तुळ

शुक्राचे भ्रमण चांगले नाही. त्वचारोग, रक्तविकार, यांची शक्मयता. अपघात व मतभेदापासून दूर रहावे, घरादाराची कागदपत्रे व्यवस्थित जपावीत. कौटुंबिक जीवन व संततीसौख्यावर या शुक्राचा प्रभाव पडण्याची शक्मयता आहे. जीवनाला कलाटणी देणाऱया घटना, एखाद्या व्यक्तीविषयीचे विशिष्ट वागणे संशयाला पुष्टी देईल.


वृश्चिक

जिवावरचे अनेक दुर्धर प्रसंग टळतील. पण कुणाला जामिन राहू नका. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. शत्रुपीडा असेल तर ती दूर होईल. आर्थिक सुधारणा होतील. व संततीच्या दृष्टीने चांगले योग. हौशी पुरवाल. आतापर्यंत न होणारी वास्तुविषयक कामे होऊ लागतील.


धनु

शेजारी व नातेवाईकांशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.लिखाण अथवा पत्रकारितेत जर काही विपरीत घटना घडत असतील तर ते दोष कमी होतील. सुखसमृद्धी वाढेल. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने जे निर्णय घ्याल त्याचा चांगला फायदा होईल. संतती नसणाऱयांना अनुकूल काळ.


मकर

प्रवास, लिखाण, धनलाभ, नवनवीन नातेसंबंध जोडणे, नातेवाईकांशी असलेले मतभेद मिटविणे या दृष्टीने अतिशय चांगले अनुभव येतील. प्रवास व महत्त्वाचे व्यवहार फायदेशीर ठरतील. भाग्योदयकारक घटना सुरू होतील. धनलाभाच्या अनेक संधी येतील. आर्थिक आवक वाढल्याने काही महत्त्वाचे अडलेले व्यवहार पूर्ण होतील.


कुंभ

गुपचूप कुणाला रक्कम दिल्याने काही  अडचणी उदभवतील. प्रवास, गाठीभेटी, उत्सव, यात भाग घेताना प्रति÷sला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. वाहन अपघात, शत्रुत्व, यामुळे मनस्ताप आहे. सर्व कामात यश मिळेल. सतत चांगल्या घटना घडतील. दुरावलेल्या व्यक्ती जवळ येतील. बिघडलेले काही संबंध पुन्हा जुळतील. वाहन अपघात, मतभेद, तंटे यापासून दूर रहावे.


मीन

कार्यक्षेत्रात उच्च पद मिळण्याचे योग. तुमचा घात महिना सुरू आहे. कुणाच्याही भानगडीत चुकूनही पडू नका. नको ते प्रकरण अंगलट येईल. चेक वगैरे न वठल्याने अडचणी उदभवतील. सोसायटी व तत्सम काही प्रकरणे त्रासदायक ठरतील. कर्ण दोषापासून जपावे लागेल. या सप्ताहात कुणाशीही वाकडेपणा येणार नाही याकडे लक्ष द्या.

Related posts: