|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अधिकाऱयांची मासिक सभांना सातत्याने दांडी

अधिकाऱयांची मासिक सभांना सातत्याने दांडी 

सभापतींसह सदस्यांनी दिला निर्वाणीचा इशारा दोडामार्ग पं.स.सभा

प्रतिनिधी / दोडामार्ग:

लेखी आदेश काढूनही अधिकारी पंचायत समितीच्या बैठकीस दांडी मारतात, ही बाब योग्य नाही. गैरहजर राहणाऱया अधिकाऱयांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींनी बैठक घ्यावी का?, असा सवाल दोडामार्ग सभापती गणपत नाईक यांनी करीत अनुपस्थित अधिकाऱयांबाबत नाराजी व्यक्त केली. सदस्य बाबुराव धुरी यांनीही कडक शब्दात अनुपस्थित खातेप्रमुखांबाबत नाराजी दर्शविली.

पंचायत समातीची वार्षिक बैठक पंचायत समिती सभागृहाबाहेर घेण्याच्या नियमान्वये आजची मासिक बैठक साटेली-भेडशी येथे केंद्रशाळेत घेण्यात आली. यावेळी सभापती गणपत नाईक, उपसभापती सुनंदा धर्णे, सदस्य धुरी, बाळा नाईक, रंजना कोरगावकर, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी नीलेश जाधव, साटेली भेडशी सरपंच नामदेव धर्णे, मुख्याध्यापिका पूनम पालव उपस्थित होत्या.

या सभेत खातेप्रमुखांचा आढावा घेताना माकडताप प्रतिबंधात्मक लस, अपंगांना सायकल वाटप, पाणीटंचाई आराखडा, प्राथमिक शाळांना संगणक संच आदी विषयांवर चर्चा झाली.

फाजील लाड खपवून घेतले जाणार नाहीबाबुराव धुरी

मागील मासिक सभेत जे खातेप्रमुख येत नाहीत, त्यांना व त्यांच्या वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्याचे ठरले होते. त्यानुसार पत्रव्यवहारही झाला. मात्र वन, कृषी आदी खात्याचे खातेप्रमुख अनुपस्थित असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आले. त्यामुळे धुरी यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे लाड चालणार नाहीत, असा इशारा दिला.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत अजूनही संभ्रमच!

मंगलोरी कौले असलेल्यांना लाभ द्यावा की न द्यावा, यावरून सभागृहात चर्चा झाली. त्यानंतर आपण त्यासंबंधिचा अध्यादेश सभापतींना देतो, असे गटविकास अधिकाऱयांनी सांगितले. याबाबत संभ्रमाचे वातावरण दिसून आले.

Related posts: