|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » डोनाल्ड ट्रम्प यांच्या जावयाची चौकशी सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जावयाची चौकशी सुरू 

वॉशिंग्टन:

अमेरिकेत नव्या प्रशासनाच्या स्थापनेदरम्यान स्वतःच्या कंपनीसाठी रशियातून अन्य विदेशी गुंतवणूकदारांकडून रक्कम प्राप्त करण्याच्या जॅरेड कुशनर यांच्या प्रयत्नांची चौकशी विशेष वकील रॉबर्ट मूलर करत आहेत. या विदेशी गुंतवणूकदारांमध्ये एका चिनी कंपनीचा समावेश होता. ही चौकशी निवडणूक मोहिमेच्या आकडय़ांचे विश्लेषण तसेच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिनसोबत कुशनर यांच्या संबंधांशी निगडित असल्याचे सांगण्यात आले.

आर्थिक धक्क्यानंतर देखील कुशनर यांच्या कंपनीच्या कार्यालयासाठी विदेशातून वित्तपुरवठा प्राप्त झाला होता.

कुशनर यांच्या वडिलांनी रियल इस्टेट विकासक तसेच कर्जप्रदाता कंपनी स्थापन केली होती. कुशनर यांनी नव्या प्रशासनादरम्यान विदेशी सरकारांसोबत संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.