|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » परभणी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला लाच घेतल्याप्रकरणी अटक

परभणी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला लाच घेतल्याप्रकरणी अटक 

ऑनलाईन टीम / परभणी

परभणीचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना ‘लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने’ अटक केली आहे. या घटनेमुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

पाझर तलावातशेतकऱयांची जमीन संपादित झाल्यामुळे त्या शेतकऱयांना जमिनीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी संयुक्तिक अहवाल उपजिल्हाधिकाऱयांना पाठवायचा होता, तो अहवाल पाठविण्यासाठी गायकवाडने तक्रारकर्त्या शेतकऱयाकडे 2 लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर शेतकऱयाने त्वरीत परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपजिल्हाधिकारी लाच मागत असल्याची तक्रार केली. एसीबीने सुद्धा शेतकऱयाच्या तक्रारीची दखल घेत एकाच दिवसात कारवाई केली. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे भूसंपादनचासुद्धा अतिरिक्त कारभार आहे.

Related posts: