|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वैद्यकीय सल्ला कमिटीची महत्वपूर्ण बैठक 27 फेब्रुवारीला

वैद्यकीय सल्ला कमिटीची महत्वपूर्ण बैठक 27 फेब्रुवारीला 

ज्ञानदा पोळेकर माता मृत्यू प्रकरण

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवकर यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

ज्ञानदा पोळेकर माता मृत्यू प्रकरणी प्राथमिक माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक गेल्या आठवडय़ात पार पडली. या समितीने डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला. या बैठकीनंतर लगेच वैद्यकीय सल्ला कमिटीची बैठक होणे अपेक्षित होते मात्र स्त्राrरोग तज्ञ नसल्यामुळे ही बैठक झाली नव्हती मात्र येत्या 27 फेब्रुवारीला जिल्हा शासकीय रूग्णालयात ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. हा अहवाल शहर पोलीसांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रल्हाद देवकर यांनी दिली.

ज्ञानदा पोळेकर प्रकरणांची महत्वपूर्ण चौकशी म्हणजे वैद्यकीय सल्ला कमिटीची बैठक होय. या समितीतील तज्ञ रत्नागिरीच्या बाहेरून येणार असल्याने यामध्ये दीरंगाई झाली होती. मात्र समितीचे तज्ञ 27 रोजी रत्नागिरीत या बैठकीसाठी येणार आहे. ही समिती जो वैद्यकीय सल्ला देईल तसेच जे इतर निष्कर्ष काढेल तो अहवाल पोलीसांना सादर केला जाणार आहे. त्यानंतरच पोलीसांना पुढील कायदेशीर प्रक्रिया करता येणार आहे.

यामध्ये पारदर्शकपणे अहवाल तयार करून देण्यात यावे जेणेकरून कोणाचाही दबावाला बळी पडू नयेत, अशा सक्त सूचना यापूर्वीच जिल्हाधिकारी प्रदीप.पी.यांनी केल्या आहेत. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी ही कायदेशीर कडक कारवाईची प्रक्रिया होणे अत्यंत गरजेच्या असल्याच्या तीव्र संतापजनक प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटू लागल्या आहेत.

Related posts: