|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सोलापूर पेपरफुटीचा कोकणात परीणाम नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट

सोलापूर पेपरफुटीचा कोकणात परीणाम नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट 

कोकणात बारावी परीक्षेला सुव्यवस्थितरित्या प्रारंभ

जिह्यात एकूण 21881 विद्यार्थी देताहेत परीक्षा

प्रतिनिधी /रत्नागिरी

उच्च माध्यमिक शालांत अर्थात बारावीच्या परीक्षेला बुधवारी प्रारंभ झाला. सोलापूर येथे पहिल्याच दिवशीचा इंग्रजी पेपर फुटल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाले. या पार्श्वभुमीवर कोकण बोर्डाचे अध्यक्ष गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोकणात अशाप्रकारे पेपरफुटीचा कोणताही प्रकार झालेला नसून यासंदर्भात विद्यार्थ्यांनी घाबरून जायचे कारण नाही. जो इंग्रजी पेपर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी सोडवला, तोच ग्राह्य धरला जाणार असल्याचे अध्यक्ष गिरी यांनी स्पष्ट केले.

कोकण बोर्ड स्वतंत्र झाल्यानंतर कोकणच्या मुलांनी राज्यात गेली 6 वर्षे प्रथम येण्याचा एकप्रकारे विक्रमच नोंदवला आहे. विशेष बाब म्हणजे कोकणच्या मुलांनी मिळवलेले हे यश अतिशय निर्भेळ आहे. कारण या सहा वर्षांत कोकणात कॉपी किंवा तत्सम इतर गैरप्रकार शुन्य आहेत. कोकण बोर्डाची भरारी पथके परीक्षा कालावधीत कसून तपासणी करतात. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे यश निश्चितच कौतूकास्पद आहे. प†िहल्याच दिवशीचा इंग्रजी पेपर फुटल्याचे वृत्त सोशल मिडीया व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारीत झाले. मात्र असे प्रकार कोकणात घडत नसून यावेळीही पहिल्या दिवशीची परीक्षाही कोणताही गैरप्रकार न घडता पार पडल्याचे कोकण बोर्डाचे अध्यक्ष गिरी यांनी स्पष्ट केले.

उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेला बुधवारी 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक..कमालीची उत्सूकता होती. तसेच नव्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहाण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थ्यांनी 10 वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती. 11 वाजता इंग्रजी पेपरला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही पहिल्या दिवशी पाल्यासोबत परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील हा दुसरा महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा असल्याने पाल्याला धीर देण्यासाठी पालकांनी हजेरी लावली होती.

कोकण बोर्डात एकूण 60 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. रत्नागिरी जिह्यात 37 परीक्षा केंद्र आहेत. रत्नागिरी केंद्रांमध्ये एकूण 11467 विद्यार्थी व 10424 विद्यार्थिनी परीक्षा देतील. यंदा रत्नागिरी व सिंधुदुर्गमधून एकूण 33,657 विद्यार्थी बारावीला परीक्षेला बसले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिह्यातील 21,881 तर सिंधुदुर्ग जिह्यातील 11,776 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

Related posts: