|Monday, October 22, 2018
You are here: Home » उद्योग » पेमेंटस् बँकांसाठी नवीन केवायसी नियम

पेमेंटस् बँकांसाठी नवीन केवायसी नियम 

वृत्तसंस्था/ मुंबई

पेमेंटस् बँकांनी ग्राहकांची ओळख तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवीन नियमावली जाहीर केली. यानुसार ग्राहकांची केवायसी तपासण्यासाठी दुसऱया कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे. भारती एअरटेलच्या पेमेंटस् बँकेने ग्राहकांची माहिती स्वतः तपासत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान विनापरवाना जमा केल्याचे उघडकीस आल्यानंतर आरबीआयकडून हा नियम जाहीर करण्यात आला.

दूरसंचार कंपन्यांकडून केवायसी तपासणी करणे अयोग्य असल्याचे आरबीआयने म्हटले. पेमेंटस् बँकांनी केवायसी तपासण्यासाठी तिसऱया कंपनीकडून नियंत्रण, लक्ष देणे आवश्यक आहे. पैशांची अफरातफर होण्याची शक्यता असल्याने आरबीआयने हा नवीन नियम जारी केला आहे. पेमेंटस् बँकांचे सध्याचे ग्राहक आहेत, त्यांच्याही केवायसीची तपासणी करणे आवश्यक आहे. आता नवीन नियमानुसार केवायसी तपासण्यासाठी 100 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाईल सिम कनेक्शनसाठी करण्यात आलेल्या केवायसी फडताळणीचा वापर पेमेंटस् बँक खाते उघडण्यासाठी करण्यात येत होता. यामुळे ही सेवा कमी खर्चिक आणि वेळेचा अपव्यय होत नव्हता. यूआयडीएआयने एअरटेलला ग्राहकांच्या परवानगीशिवाय पेमेंटस् बँक खाते उघडल्याप्रकरणी दंड ठोठावला होता. यानंतर एअरटेलच्या पेमेंटस् बँकेचे सीईओ शशी अरोरा यांनी राजीनामा दिला होता.

Related posts: