|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » जगातील सर्वात मोठय़ा ब्रेनटय़ूमरची यशस्वी शस्त्रक्रिया

जगातील सर्वात मोठय़ा ब्रेनटय़ूमरची यशस्वी शस्त्रक्रिया 

ऑनलाईन टीम / मुंबई

जगातील सर्वात मोठय़ा ब्रेनटय़ूमरची शस्त्रक्रिया मुंबईच्या नायर रुग्णालयात यशस्वीरित्या करण्यात आली आहे. मेंदूपेक्षा जास्त वजन असलेला म्हणजे 1.873 किलोचा हा ब्रेनटय़ूमर होता.

संतलाल पाल असे या 31 वषीय तरूणाचे नाव असून, संतलालने डोकेदुखीमुळे हैराण झाल्याने सिटी स्कॅन आणि एमआरआय केला होता. त्यावेळी डोक्मयात कवटीच्या हाडांद्वारे मोठी गाठ पसरल्याचे आढळून आले. या गाठीमुळे संतलालच्या डोक्मयावर जडपणा आणि दृष्टीदोषात अंधत्व आले होते. नायर हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती डी. नाडकर्णी यांनी 14 फेब्रुवारीला संतलालवरील ब्रेन टय़ूमरची शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया तब्बल सात तास चालली आहे. जगातील पहिलीच इतकी मोठी गाठ असलेली ही शस्त्रक्रिया होती. या शश्त्रक्रियेद्वारे गाठीचे निर्मूलन करण्यात आले असून, सध्या रूग्णाची प्रकृती स्थिर आहे.

 

Related posts: