|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » ‘पीएनबी’कडून 18 हजार कर्मचाऱयांच्या बदल्या…

‘पीएनबी’कडून 18 हजार कर्मचाऱयांच्या बदल्या… 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11,500 हजार कोटींच्या घोटाळय़ाबाबतीत प्रथमच बँकेने ठोस पावले उचलली आहेत. बँक मॅनेजमेंटने गेल्या एका आठवडय़ात सुमारे 18 हजार कर्मचाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. सीबीआय सातत्याने बँकेतील कर्मचाऱयांना अटक होत असताना या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पंजाब नॅशनल बँकेने या बदल्यांची तयारी सुरू केली आहे. बदल्यांची यादी बुधवारी 21 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या आदेशानुसार बँकेने कारवाई सुरू केली आहे. सीव्हीसीने मंगळवारी बँकांसाठी ऍडवायजरी जाहीर केली. यात असे लिहिले आहे, की 21 फेब्रुवारीपर्यंत तीन वर्षांहून अधिक काळापर्यंत एकाच पोस्टवर असणाऱया ब्रँचमधील अधिकारी आणि पाच वर्षांहून अधिक काळापर्यंत एकाच बँकेत काम करणाऱया क्लार्क यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर बदलीची प्रक्रिया सुरू झाली. या घोटाळय़ात सीबीआयने आतापर्यंत पीएनबीच्या मुंबई शाखेतून सुमारे 13 अधिकाऱयांना अटक केली आहे.

 

 

Related posts: