|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » लढाऊ विमान उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक

लढाऊ विमान उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने एमआयजी-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. अनवीने एकटीनेच लढाऊ विमान उडवत पहिली महिला वैमानिक ठरण्याचा इतिहासही रचला आहे.

अवनी मध्य प्रदेशातील रेवा जिह्यातील आहे. 2014 मध्ये तिने राजस्थानच्या बनस्थली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर तिने भारतीय हवाई दलाची परीक्षा उत्तीर्ण केली. 25 वषीय अवनीने आपले प्रशिक्षण हैदराबाद एअरफोर्स अकॅडमीतून पूर्ण केले आहे. एकटीने लढाऊ विमान उडवणे हे तिचे संपूर्ण लढाऊ वैमानिक होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे.

अवनीचा जन्म 27 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. तिचे वडिल दिनकर चतुर्वेदी हे मध्यप्रदेश सरकारमध्ये जलसंवर्धन विभागात कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. अवनीचा मोठा भाऊ लष्करात अधिकारी आहे. जगभरात असे निवडक देश आहेत जिथे महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते. यामध्ये इस्त्रायल, अमेरिका, ब्रिटन आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. भारतात ऑक्टोबर 2015 ला केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याने अवनीने याचा पुरेपूर फायदा घेतल्याचे दिसत आहे. महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी 2016 मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात कमिशन केले होते.

गुजरातमधील जामनगर एअरबेसवरून 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने उड्डाण घेतले आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केले आहे. अवनी चतुर्वेदी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.

 

 

 

 

 

Related posts: