|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » leadingnews » मनोहर पर्रिकर डिस्चार्जनंतर अर्थसंकल्प मांडणार ?

मनोहर पर्रिकर डिस्चार्जनंतर अर्थसंकल्प मांडणार ? 

ऑनलाईन टीम / मुंबई

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरूवारी सकाळी मुंबईतील लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळताच पर्रीकर गोव्याकडे रवाना झाले आहेत. राजधानी पणजीत पोहचताच ते गोवा विधानसभेत जातील आणि तेथे स्वतः आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मनोहर पर्रीकरांवर मागील आठवडय़ापासून मुंबईतील लिलावती रूग्णालयात पोटदुखीचा त्रास होत असल्याने दाखल झाले होते. मात्र, त्यांना स्वादुपिंडाचा आजार असल्याचे समोर आले असल्यामुळे गेली आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या आरोग्या बाबतीत विविध तपासणी करण्यात आल्या. पर्रीकरांचा हा आजार गंभीर असल्याचे बोलले गेले. परंतु, रूग्णालयाने त्याचे खंडन केले. दरम्यान, रविवारी मुंबई दौऱयावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिलावतीत जाऊन पर्रीकरांच्या तब्बेतीची विचारपूस केली. सोबत पर्रीकरांच्या तब्बेतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवली आहे. सध्या पर्रीकरांची तब्बेत ठीक आसल्यामुळेच लिलावतीतून त्यांना तात्पुरता डिस्चार्ज दिला गेला आहे. आज दुपारी ते गोवा विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Related posts: