|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न झाला, तेंव्हा आपुलकी कुठे गेली होती ? : उद्धव ठाकरे

बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न झाला, तेंव्हा आपुलकी कुठे गेली होती ? : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या वयाच्या 70 व्या वषी अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.

शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार निलम गोऱहे यांच्या ‘शिवसेनेतील माझी वीस वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उद्धव बोलत होते. आर्थिक निकषांनुसार आरक्षण ही बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली असती, तर जातीपातीच्या भिंती उभ्याच राहिल्या नसत्या, मात्र, बाळासाहेबांची भूमिका न जोमानता जातीपातीच्या आधारावर राजकारण करण्यात आले, शिवसेना फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. 1992-93 साली प्रकाशित झालेल्या एका अग्रलेखाचे प्रकरण 2000 साली उकरून काढण्यात आले. त्यावरून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू झाले. तेंव्हा पवार साहेब कुठे होते. तेंव्हा त्यांना बाळासाहेब आठवले नाही का ? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टिका केली.

पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. मात्र हा सर्व राजकारणाचा भाग असल्याचं उद्धव म्हणाले.

 

Related posts: