|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » खेतीगाडीवर मिळणार शेतकऱयांना भाडय़ाने शेतीविषयक औजारे

खेतीगाडीवर मिळणार शेतकऱयांना भाडय़ाने शेतीविषयक औजारे 

ऑनलाईन टीम / पुणे

शेतीविषयक उपकरणांची खरेदी, विक्री आणि उपकरणे भाडय़ाने देण्यासाठीच्या खेतीगाडी या वेबसाईटचे पुण्यात गुरुवारी उद्घाटन झाले. याद्वारे शेतकऱयांना विविध कंपनींची ट्रक्टर, औजारे ही रास्त भावात व एका क्लिकवर मिळतील. साताऱयातील युवा उद्योजक प्रवीण शिंदे यांनी या संकेतस्थळाची स्थापना केली आहे.

शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधित समाजांना पेलावी लागणारी आव्हाने लक्षात घेवून ‘खेतीगाडी’ मार्फत सोपे, सुकर, सोयीस्कर असे एकाच प्रकारचे उपाय येथे पुरवले जातात. या मंचावर सर्व प्रकारचे ब्रॅड, सर्वाधिक शक्तीचे ट्रेक्टर्स उपलब्ध असतील. या मंचाचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतीच्या पद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास सांगत येथे शेतकऱयांना सक्षम बनवने हा असेल.

या उद्घाटनाप्रसंगी खेतीगाडीचे संस्थपक प्रवीण शिंदे असे म्हणाले की, भारतामध्ये इंटरनेटचा वापर पुर्वी जास्त प्रमाणात नव्हता. आता मात्र, याचा वापर ग्रामीण भागातही केला जातो. शेतकऱयांना केंद्रस्थनी धरूनच या मंचाची संकल्पना निर्माण करण्यात आली आहे. यातून शेतकऱयांचा सर्वाधिक फायदा व्हावा हाच आमचा मुळ उद्देश आहे. शेतीच्या अपुऱया माहितीमुळे भरपुर वेळेस शेतकरी चुकीची उत्पादने वापरतात आणि त्यातून त्यांना विविध प्रकारचे नुकसान सहन करावे लागतात. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ‘खेतीगाडी’ या मंचाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱयांना तंत्रज्ञानावर आधारीत शेतीविषयक उपकरणे वापरण्यासाठी व प्रोत्साहीत करण्यासाठी खेतीगाडी च्या टीमने शेतकऱयांसाठी ‘खेतीगाडी ऍप’ हा दहा भाषांमध्ये सुरू केला असून यासंबंधित माहितीसाठी खेतीगाडी.कॉम हे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे.