|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » साहित्य हे लिंगभेदाच्या पलीकडचे : प्रतिभा रे

साहित्य हे लिंगभेदाच्या पलीकडचे : प्रतिभा रे 

गेटवे लिस्ट फेस्टचे उद्घाटन

मुंबई / प्रतिनिधी

आजच्या महिला सक्षम आणि सबल आहेतच. पण त्यांच्यावर कोणतेही बंधने असता कामा नये तर त्यांना मुक्त होऊन दिले पाहिजे. साहित्य हे लिंगभेदाच्या पलिकडे आहे. त्याचा त्याच पद्धतीने आस्वाद घ्यावा. आजची पिढी ही पुढारलेली आहे. मुक्त अभिव्यक्तीशिवाय साहित्य पूर्णच होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ विजेत्या लेखिका प्रतिभा रे यांनी व्यक्त केले.

प्रादेशिक साहित्याचा गौरव करणाऱया 4 थ्या गेट वे लिटरेचर फेस्टिव्हलच्या

निमित्ताने त्या बोलत होत्या. साहित्यातील स्त्राr सशक्ती यावर यंदाचा गेट वे लिट फेस्टिव्हल असून या तीन दिवसीय साहित्य महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन यांच्या हस्ते गुरुवारी एनसीपीए येथे झाले. या तीन दिवसीय साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने 17 प्रादेशिक भाषांतील तब्बल 50 हून अधिक भारतीय स्त्राr लेखिका सहभागी होणार आहेत.

आज स्त्रिया वैविध्यपूर्ण विषयांवर लिहित असल्या आणि कलाकृतीही करत असल्या तरीही अजूनही लैगिंक संदर्भात स्त्राr ने केलेले बोल्ड विधान असो किंवा मग ती कलाकृती असो ती स्विकारण्याकडे समाजाचा कल आजही नाही. त्याचप्रमाणे स्त्राr ने केलेल्या निर्मितीला तसेच स्त्राr करत असलेल्या कामाकडे बायकी हे विशेषण लावण्याची परंपरा कायम असून ती बदलायला हवी असे मत चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शिका अपर्णा सेन यांनी महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात व्यक्त केले.

आज इंग्रजी साहित्य म्हणजे भारतीय साहित्य असे म्हणण्याचा ट्रेड पुढे येत आहे. आज वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्यामध्ये जे प्रयोग होतात ते पाहण्याची संधी गेट वे लिटरेचर फेस्टिव्हलच्या निमित्ताने मिळत असल्याचे उद्गार सुप्रसिद्ध बंगाली

लेखक सुबोध सरकार यांनी काढले.

Related posts: