|Monday, December 10, 2018
You are here: Home » leadingnews » मुलाखतीनंतर शरद पवारांची काळजी वाटते : शिवसेना

मुलाखतीनंतर शरद पवारांची काळजी वाटते : शिवसेना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांची पुण्यात मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवरून अनेक प्रतिखियका उमटत असल्याचे दिसत आहे. शरद पवार हे बेरजेचे राजकारण करतात मात्र गेली काही वर्षे त्यांची गणित चुकते आहे. त्यांच्या बेरजा- वजाबक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल.ऐतिहासिक मुलाखतीमुळे शरद पवार इतिहास जमा तर होणार नाहीत ना? अशी काळजी आम्हाला वाटते असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीवर निशाणा साधला आहे.

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शरद पवार यांच्याकडून राजकीय भूमिका घेताना काही चुका होत असल्याचे दिसत आहे. पवारांचा यापूर्वीचा लौकिक लक्षात घेतला तर ते आधी उत्तर काढायचे आणि त्यानुसार बाकीची राजकीय बेरीज-वजाबाकीची आकडेवारी भरायचे. यामध्ये त्यांचा हातखंडा होता. मात्र, गेली काही वर्षे पवारांचे उत्तर चुकते आहे. त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्मयांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीने पवार इतिहासजमा तर होणार नाहीत ना? आम्हाला काळजी वाटते हो, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

 

 

Related posts: