|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » नवी मुंबईत तरूणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न

नवी मुंबईत तरूणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थाकनात गुरूवारी 43 वर्षीय इसमाने एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुर्भे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर ही घटना घडली आहे.

काल सकाळी साडे अकराच्या दरम्यान एक तरुणी तुर्भे स्थानकात लोकलची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी आरोपी नरेश जोशी याने मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारानंतर आरपीएफ पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीला अटक केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला वाशी जीआरपीकडे सोपवलं असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.