|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2018 

मेष: वैवाहिक जीवनात मतभेद, डोळे व पोटाचे आजार उद्भवतील.

वृषभः संघर्ष व अति परीश्रमाने सर्व कामात यश पण ते कायम टिकेल.

मिथुन: नको ते लेप लावल्याने सौंदर्य प्राप्तीऐवजी हॉस्पिटलची वारी.

कर्क: नको त्या लोकांचे येणेजाणे त्रासदायक व आर्थिक हानीकारक.

सिंह: हाताखालचे लोक व नोकरांकडून महत्त्वाच्या बातम्या समजतील.

कन्या: कोर्टकचेरीच्या कामात अडचणी, डोळय़ांचा त्रास.

तुळ: विष शस्त्र व अग्निभय, काळजीपूर्वक राहणे योग्य.

वृश्चिक: चूक नसताना नको ते आळ तुमच्यावर येतील.

धनु: राहत्या जागेचा प्रश्न सुटेल, धनलाभ, मित्रांचे सहकार्य लाभेल. 

मकर: अडलेल्या कामांना गती, नोकरीत, अधिकारात वाढ.

कुंभ: बडय़ा व श्रीमंत व्यक्तीकडून त्रास, धननाश, आर्थिक घोटाळे.

मीन: शस्त्राघात, शत्रूपीडा, मानहानी, हलक्मया लोकांकडून टीका.