|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रकल्पग्रस्त करणार रिफायनरीची होळी

प्रकल्पग्रस्त करणार रिफायनरीची होळी 

शिमगोत्सवात अनोखे आंदोलन

व्यापक जनजागृतीचा निर्णय

प्रतिनिधी /राजापूर

कोकणवासीयांचा महत्वाचा सण असलेल्या शिमगोत्सवात रिफायनरीचा म्द्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाबाबतच्या सरकारच्या धरसोड भुमिकेनेत संतप्त झालेले प्रकल्पग्रस्तांनी शिमगोस्तवात रिफायनरीची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या आंदोलनातून रिफायनरीविरोधातील तीव्र भावना व्यक्त केल्या जाणार असून व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.

गणपती, दिवाळीनंतर कोकणात शिमग्याला मोठय़ा प्रमाणात चाकरमानी दाखल होतात. नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या या परिसरात दररोज शिमगा सुरू झाला आहे. होळी दिवशी जशा फाका मारल्या जातात, तशाच काहीशा फाका राजकारणी लोक एकमेकांच्या विरोधात मारताना दिसत आहेत.

आता सर्व कोकण या शिमग्यानिमित्ताने या रिफायनरींविरोधात सामील करून घ्यायची वेळ आली आहे. गेले पाच-सहा महिने नाणार आणि आजूबाजूच्या लोकांनी या रिफायनरीविरोधात जे कष्ट सोसले आहेत, किमान ते तरी या शिमग्यानिम्मिताने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्प विरोधी हा लढा किती प्रखर आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. शिमग्याच्या दिवसात रिफायनरीविरोधात एक व्यापक असा कार्यक्रम झाला तर या जनजागृतीला अजून बळ येईल असा विश्वास नेत्यांना आहे.

प्रकल्पग्रस्तांची आगळीवेगळी होळी

या शिमगोत्सवात रिफायनरीची होळी करण्यात येणार आहे. रिफायनरी बाधित व ग्रस्त सर्व गावांतील प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन ही आगळीवेगळी होळी करण्यात येणार असल्याची माहिती रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष ओंकार प्रभूदेसाई व सचिव भाई सामंत यांनी दिली.

Related posts: