|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवाजी महाराज शेतकऱयांचे कैवारी : प्राचार्य कॉ. मेणसे

शिवाजी महाराज शेतकऱयांचे कैवारी : प्राचार्य कॉ. मेणसे 

 

प्रतिनिधी/ आजरा

शिवाजी महाराजांची शेतसारा वसुलीची करप्रणाली ही शेतकरी व शेती वाचवणारी होती. आजच्या राजकर्त्यांना महाराजांचे शेतीविषयक धोरण आदर्शवत आहे. महाराजांच्या काळात एकाही शेतकऱयांने आत्महत्या केली नाही. शिवाजी महाराज हे शेतकऱयांचे कैवारी होते असे मत प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. पेरणोली येथे शिवजंयतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते शिवाजी महाराजांचे जीवनचरीत्र या विषयावर बोलत होते.

स्वागत सतीश कांबळे यांनी तर प्रास्ताविक कॉ. संपत देसाई यांनी केले. यावेळी मेणसे म्हणाले, शेती चांगल्या प्रकारे पिकावी यासाठी धोरण राबविले. महाराजांचे शेतीविषयक धोरण विचार करायला लावणारे होते. शेतकऱयांना बी-बियाणे, शेतीसाठी पाणीपुरवठा योजना राबविल्या. शेतकरी जगला तर जनता जगेल व राज्य टिकेल त्यामुळे दुष्काळातही शेतकऱयाला टिकवण्याचे काम महाराजांनी केले. त्यामुळे शेतकऱयाच्या पाठीवर स्वराज्य उभे राहिले.

प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम शिवरायांनी केले. आज महाराजांच्या बत्तीसमण सिंहासनाचा विषय मांडला जातो. पण शिवाजी महाराज असते तर ते सोन्याच्या सिहांसनावार न बसता दुष्काळातील शेतकऱयाला मदतीचा हात दिला असता. मनस्मृतीचा वारसा सागणाऱयांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, जन्मनोंदीचा घोळ घातला. स्वराज्यासाठी दादोजी कोडदेवांचे स्थान महत्वाचे होते. त्याचबरोबर शिवरायाच्या माता जिजाबाई, वडील शहाजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवरायांचे राज्य कोणत्याही धर्मावर आधारीत नव्हते ते जनतेचे राज्य होते. त्याच्या सैन्यात हिंदू, मुस्लीम यासारखे अनेक जातीपातीचे लोक राहत होते. प्रत्येकाचा स्वाभिमान जागवण्याचे काम शिवरायांनी केले असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा. नवनाथ शिंदे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, आजरा कारखाना संचालक राजेंद सावंत, सरपंच दीपिका सुतार, उपसरपंच प्राजक्ता देसाई, संजय मोहिते, उत्तम देसाई, हिंदूराव कालेकर, सुभाष देसाई, दिपक लोखंडे, सुरेश शिवणे, दिपक देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अतुल देसाई यांनी आभार मानले.

Related posts: