|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जनतेची साथ आणि आशीर्वाद हीच भाजपची खरी ताकद : खा. पुनम महाजन

जनतेची साथ आणि आशीर्वाद हीच भाजपची खरी ताकद : खा. पुनम महाजन 

प्रतिनिधी/ सांगोला

निवडणुकांमध्ये जनतेने विकासाला साथ दिली. देशातील 60 टक्के भागावर भाजपची सत्ता आहे. जनतेची साथ, आपुलकी आणि आशीर्वाद हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पुनम महाजन यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करताना शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी सांगोला येथे भेट देवून त्यांनी युवकांशी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमार, सरचिटणीस अमोल जाधव, विक्रांत पाटील, सचिव अशिष राऊत, गितांजली ठाकरे, स्वप्निल लोकरे, जिल्हा शहराध्यक्षा वृषाली चालुक्य, आ. योगेश टिळेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक गजानन भाकरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीआण्णा गायकवाड, शहराध्यक्ष आनंद फाटे यांच्यासह जिह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

लोकांनी आपल्याला मतदान केले आहे. त्यानंतर त्यांच्या अपेक्षा आहेत की, भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर रोजगार उपलब्ध व्हावा, यावर मागील साडेतीन वर्षात पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरुन काढला आणि लोकांसाठी काम करीत आलो आहोत. विरोधकांनी फक्त सत्तेचे राजकारण केले आहे. त्यामुळे, विकासाच्या मुद्यावर भाजपचेच पदाधिकारी जनतेला उत्तरे देतील. सरकारने यावर्षी जे बजेट सादर केले ते युवकांसाठी व कृषीप्रधान देशासाठी लाभदायक आहे. या बजेटमध्ये माझा शेतकरी बलशाली होवून देशाला पुढे घेवून जावू शकेल आणि युवक देशाची सुधारणा करण्यासाठी सक्षम बनेल.

मोबाईल इंटरनेटवरुन उमंग या संकेतस्थळाव्दारे कोणत्याही डॉक्टरची वेळ रुग्णांना घेता येते, ज्या कुटूंबाला शौचालय नाही त्यांना शौचालय मिळते, महिलांना मोबाईलव्दारे गॅस सिलेंडरही उपलब्ध होते. या सर्व सुविधांची दारे भाजप सरकारने सर्वासांठी खुली केली आहेत. यापुढे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. तसेच मोबाईल म्हणजे जीवन झाले आहे, पदाधिकाऱयांनी सोशल मिडीयावरुन

Related posts: