|Saturday, April 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रविवार  25 फेबुवारी ते 3 मार्च 2018

मेष

मीन राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. या सप्ताहात तुम्ही महत्त्वाची कामे करण्याचा भेट घेण्याचा व चर्चा करण्याचा प्रयत्न करा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्या अंदाजाला महत्त्व  येईल. धंद्यात लाभ होईल. संसारात  किरकोळ वाद सप्ताहाच्या शेवटी होऊ शकतो. शेतकरीवर्गाने थकबाकी लवकर वसुल करावी. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन काम मिळेल. कोर्टकेसमध्ये यशाच्या जवळ जाल.


वृषभ

पूर्वी झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल, ती सोडू नका. मीनेत शुक्र,  बुधाचे राश्यांतर  तुमच्या कार्यात मदत  करणार  आहे. धंद्यात सुधारणा होईल. शेतकरी वर्गाचे अडचणीत आलेले काम करून घेता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घेतल्यास प्रति÷ा मिळेल. प्रामाणिकपणाने केलेले प्रयत्न कला-क्रीडा क्षेत्रात  फायदा देणारे ठरतील. परीक्षेसाठी जास्त अभ्यास करा तरच यश मिळेल.


मिथुन

 तुमच्या उत्साहाला चांगले कारण मिळेल. मीन राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. मनातील अनेक इच्छा पूर्ण करण्याचे चिन्ह दिसेल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्या अधिकाराचा उपयोग करून घेता येईल. कष्ट घ्या, अधिक मोठे यश मिळेल. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये लाभ मिळेल. नोकरी मिळेल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परदेशात जाण्याचा योग येईल. कोर्टकेस जिंकता येईल. संसारात प्रगतिकारक वातावरण राहील.


कर्क

कर्केच्या भाग्यात शुक्र, बुधाचे राश्यांतर होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला ताण-तणाव सहन करावा लागेल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्या कामातील चुका दाखवण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक दुखावले जातील. संसारात वृद्ध व्यक्तीच्या प्रकृति संबंधी चिंता वाटेल. धंद्यात फायदा कमी झाला तरी चालेल.  परंतु मोठी गुंतवणूक करू नका. शेअर्समध्ये  अंदाज चुकण्याची शक्मयता आहे. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील. विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी जास्त अभ्यास करावा.


सिंह

मीन राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक  कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल. मंगळवार, बुधवार तुमच्यावर एखाद्या कामाचा दबाव येईल. तुमचे बोलणे व कृती यात अंतर पडल्यास तुमच्यावरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्मयता निर्माण होईल. संयमाने विचारपूर्वक बोला. कोर्टकेसमध्ये मदत घेऊ शकाल. धंद्यात स्थिरता ठेवता येईल. शेतकरी वर्गाला मदत मिळू शकेल. संसारातील समस्या सोडवताना किरकोळ मतभेद होईल.


कन्या

होळी पौर्णिमा व धुलीवंदन या दिवशी कोणत्याही ठिकाणी वाद होऊ शकतो. अतिरेक व अहंकार नको. व्यसनाने अडचणीत याल. मीन राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. राजकीय सामाजिक कार्यात निरीक्षण करा. मत व्यक्त करण्याची गरज नाही. सहनशिलता ठेवा. संसारात खर्च व धावपळ होईल. धंद्यात लक्ष द्या. निर्णय पुढील आठवडय़ात घेता येईल. विद्यार्थीवर्गाने अनुचित प्रकार करू नये. अडचणी वाढू शकतात.


तूळ

या सप्ताहात महत्त्वाची कामे करून घ्या. मीनराशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. संसारात पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. कामाचा व्याप नोकरीत वाढेल. धंद्यात जम बसेल. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय सप्ताहाच्या शेवटी घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेस संपवता आल्यास ठीक होईल. विद्यार्थी वर्गाने वेळच्या वेळीच अभ्यास करावा.


वृश्चिक

मीन राशीत शुक्र, बुधाचे राश्यांतर तुम्हाला उत्साह देणारे ठरेल. धंद्यातील नुकसान भरून काढता येईल. शेअर्सचा अंदाज मंगळवारपासून बरोबर येईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी वर तोडगा काढता येईल. तुमच्या  कामातील चुका दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कला- क्रीडा क्षेत्रात चमकाल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास जास्त करावा, तरच चांगले यश मिळेल. भ्रमात राहू नये.

धनु

साडेसाती शुभ आहे. मीन राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. अडचणी कमी होतील. आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल. तरीही मंगळवार, बुधवार, प्रवासात सावध रहा. किरकोळ दुखापत संभवते. वाद होईल. गुप्त कारवायांना राजकीय, सामाजिक कार्यात कमी लेखू नका. प्रति÷ा टिकवता येईल. शेतकरी वर्गाचे  नुकसान भरून निघू शकेल. प्रयत्न करा. आप्ते÷ांच्या सहवासात रमून जाल. आंनद मिळेल. अविवाहितांना चांगले स्थळ मिळेल.

मकर

 मीन राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. या सप्ताहात तडजोड करावी लागण्याची शक्मयता आहे. अडचणीवर मात करता येईल. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात नवे धोरण ठरवावे लागेल. विचारपूर्वक योजना बनवा. पुढील आठवडय़ात तुमचे वर्चस्व अधिक वाढेल. अतिरेक व अहंकार ठेवू नका. धंद्यात चांगली संधी मिळेल. होळी व धुलीवंदन या दिवशी अनुचित प्रकार घडू शकतो. व्यसनाने धुंद होऊ नका. नोकरीत कायद्यानेच काम करा. विद्यार्थीवर्गाने ध्येय पूर्ण करावे.

कुंभ

तुमच्या क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. मान- सन्मान वाढेल. लोकांचे सहकार्य व प्रेम मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचे निर्णय घेता येतील. मंगळवार, बुधवार विरोधकांना गप्प करण्यात तुमचा उपयोग करून घेतला जाईल. धंद्यात मोठी संधी मिळेल. शेतकरी वर्गाला नवा पर्याय मिळेल. नुकसान भरपाई मिळू शकेल. प्रयत्न करा. नोकरीत प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.प्रेमाला चालना  मिळेल. कठीण कामे करता येतील.

मीन

तुमच्याच राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. अडचणी संपल्या नाही. तरीही सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होऊ शकतात. राजकीय- सामाजिक कार्यात संयमाने बोला. वरि÷ांना दुखवू नका. धंद्यात आहे ती परिस्थिती सांभाळून घ्या. गुंतवणूकची घाई नको. संसारात  होळीच्या दिवशी मतभेद होऊ शकतात. मैत्रीत दुरावा येईल. व्यसनाने मोठे नुकसान होईल. भावनेच्या भरात कुणालाही, कोणतेही आश्वासन देऊ नका. परीक्षेसाठी जास्त अभ्यास करा.

 

 

Related posts: