|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » काँग्रेस व राष्ट्रवादी देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षांना हद्दपार

काँग्रेस व राष्ट्रवादी देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षांना हद्दपार 

 

प्रतिनिधी/ म्हसवड

स्वत:ला जाणता राजा समजणाऱयांनी कर्जमाफी फक्त आजपर्यंत कारखानदार बागायतदार, आणि मोठय़ा शेतकऱयांना दिली. भाजपाने मात्र सर्वसामान्य शेतकयांना कर्जमाफी देवून शेतकरी जगवण्याचे काम केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष म्हणजे देशाला लागलेला कलंक असून हा कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षाला हद्दपार करण्यासाठी तसेच माण खटाव विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय करण्यासाठी कामाला लागा. भाजप सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन भाजपा खासदार व राष्ट्रीय युथ अध्यक्षा पुनमताई महाजन यांनी म्हसवड येथे जाहीर सभेत केले. 

   म्हसवड येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजीत युवा संवाद यात्रेनिमीत्त बाजार तळावर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपाचे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर,  माजी आ. डॉ. दिलीप येळगांवकर,  जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई,  जि. प. सदस्या सुवर्णा देसाई, तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ,  प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब खाडे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संदीप भोसले, मार्तंड गुरव, आदी प्रमुख उपस्थित होते. 

  यावेळी पुढे बोलताना महाजन म्हणाल्या की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासुन दुष्काळी भागातील तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱया पाण्याची सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. एकटय़ा माणसाठी भाजपने सुमारे साडे 4 कोटी रुपयांचा भरघोस निधी देवून या तालुक्यातील 16 गावांचा पाणीप्रश्न सोडवला आहे, तर केंद्रातुन या जिह्यासाठी दोन राष्ट्रीय रस्ते विकास निधीतून 1200 कोटी रुपये दिले असून आज या रस्त्यांची कामे जलदगतीने सुरु आहेत. शेतकऱयांसाठी ऐतिहासिक अशी सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या पक्षाने केली आहे. जे खरे गरजवंत शेतकरी आहेत त्यांनाच आमच्या सरकराने कर्जमाफी दिली आहे. बडे व धनदांडग्याना यातून वगळल्याने विरोधक आमच्या कर्जमाफीचे ऑडीट करायला निघाले  आहेत. आघाडी सरकाच्या काळातील कर्जमाफी नक्की कोणाला मिळाली याचा विचार करा ती कर्जमाफी फक्त दोन्ही कॉंग्रेसच्या पुढाऱयांनीच लाटली अन् देशाला अर्थिक संकटात व शेतकऱयांना उपाशी ठेवण्याचे काम करणारे आत्ता हातात घडय़ाळ बांधुन मनसेच्या इंजिनचे धक्के घेण्याचा खटाटोप करणारे हेच का जाणते राजे अशी बोचरी टिका त्यांनी केली. तसेच      फक्त भाषणे करुन प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो त्यामुळेचे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी संवाद साधता यावा यासाठी या संवाद यात्रेचे नियोजन केले असल्याचे खा. महाजन यांनी शेवटी स्पष्ट केले. 

   आमदार योगेश टिळेकर म्हणाले, सध्याचे भाजप सरकार हे खऱया अर्थाने शेतकऱयांचे सरकार म्हणून ओळखले जात आहे, या सरकराने शेतकऱयांसह ग्रामीण जनतेच्या व्यथा समजून घेता याव्यात म्हणून अशाप्रकारच्या संवाद यात्रेचे नियोजन केले आहे. सरकारने ग्रामीण भागातील पाणी प्रश्नासाठी, जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवून गावे पाणीदार बनवली आहेत. यापुर्वीच्या सरकारने शेतीचे नैसर्गिक आपत्तीमुळे 50 टक्के जरी नुकसान झाले तरीही शेतकऱयांना नुकसान भरपाई दिली नव्हती. मात्र, आमच्या सरकारने केवळ 35 टक्के नुकसान झाले तरीही शेतकऱयांना 100 टक्के भरपाई देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.  खासदार पुनमताईंच्यामुळे तरुणांना युवा मोर्चाच्या माध्यमातुन ताकत दिली जात आहे. 

    यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई बोलताना म्हणाले, की मी यापूर्वी दोन्ही कॉंग्रेसमध्ये होतो या दोन्ही पक्षाचे धोरण वापरा अन् फेकून द्या हे एकच धोरण असल्याने मला माझ्या तालुक्यातील 16 गावांचा पाणीप्रश्न सोडवता आला नाही. ज्या टेंभू योजनेत माणमधील वगळलेली 16 गावे आहेत त्या गावांवर यापुर्वीच्या सत्ताधिकाऱयांनी अन्याय केला होता त्यांना न्याय देण्यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्यादिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टेंभू योजनेत 16 गावांचा समावेश करीत असल्याची घोषणा करुन त्यासाठी 4 कोटी 32 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. माणगंगा बारमाही वाहती करण्यासाठी या पक्षाने 800 कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली असून आणखी 376 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माण तालुक्यातील सर्वसामान्य गरीबांना कमी किमतीत हक्काचे घर मिळावे यासाठी भाजपने म्हाडा घरकुल योजनेंतर्गत म्हसवड येथील सर्व्हे नं. 274 मध्ये म्हाडाची 4 हजार घरे उभारण्याचा निर्णय घेतला असून त्या घराची किंमत ही फक्त 7 लाख इतकी राहणार आहे. त्यातील अडीच लाख रुपयाचे अनुदान हे आमचे सरकार देणार आहे तर उर्वरीत रक्कमेच्या परतफेडीसाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकाशी टायप केला आहे, त्यामुळे लाभार्थ्याला फक्त 2 हजार 500 इतका कमी घराचा हप्ता बसणार आहे. तर माण तालुक्याच्या भूमीत 669 मेगावँटची विजनिर्मीती होत असल्याने या तालुक्याला विजेच्या भारनियमनातुन वगळले जावे, अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे तर ज्या सातारा जिह्याने नेहमीच दोन्ही काँग्रेसची नेहमी पाठराखण केली त्या सातारा जिह्यातील रस्त्यांच्या कामी भाजप सरकारने 1200 कोटी रुपयांचा निधी दिला असून आज येथील रस्त्यांची कामे वेगात सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात जनता भाजपचाच आमदार व

Related posts: