|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » बाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार सचिन-स्वप्नील

बाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार सचिन-स्वप्नील 

सचिन पिळगांवकर… स्वप्नील जोशी… ऑफक्रिन असो वा ऑनक्रिन ही जोडी सगळय़ांच्याच आवडीची… मानसपिता-पुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं… पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून ते आपल्याला वडिलांच्या स्थानी असल्याचं म्हणणारा स्वप्नील जोशी तर स्वप्नील ला मुलासारखं वागवणारे सचिन पिळगांवकर… पिता-पुत्राचे भावबंध खऱया अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे नातं साकारण्यास सज्ज झाली आहे.

2008 मध्ये आलेल्या ‘आम्ही सातपुते’ या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठय़ा पडद्यावर झळकली आणि यांचे अनोखे बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले. त्यानंतर आलेल्या काही गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीच्या दिलखुलास गप्पांनी या दोघांमधल्या प्रेमळ नात्याची पोचपावती प्रेक्षकांना दिली. आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे आणि त्यात विशेष म्हणजे मानसपिता-पुत्राची ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कोणता? या चित्रपटाची कथा काय? पिता-पुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात आहेत.