|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » क्षी जिनपिंग यांच्यासाठी राज्यघटना बदलणार चीन

क्षी जिनपिंग यांच्यासाठी राज्यघटना बदलणार चीन 

तिसऱयांदा अध्यक्षपद स्वीकारता येणार

  वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनमध्ये दोनवेळा अध्यक्ष होण्याची मर्यादा लवकरच संपुष्टात आणली जाऊ शकते. रविवारी चीनच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाने याप्रकरणी एक प्रस्ताव सादर केला. यात राज्यघटनेतील कोणताही व्यक्ती कमाल दोनदाच अध्यक्ष होऊ शकण्याची तरतूद बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षी कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत क्षी जिनपिंग यांना दुसऱयांदा अध्यक्षपदासाठी निवडले होते. राज्यघटनेत बदल झाल्यास 2 पेक्षा अधिक वेळा अध्यक्ष होण्याची संधी मिळणारे जिनपिंग पहिलेच नेते ठरतील.

केंद्रीय समितीचा प्रस्ताव

अध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल पक्षाच्या केंद्रीय समितीने संसदेत प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार उपाध्यक्ष देखील दोनपेक्षा अधिक वेळा पदावर राहू शकतात. समितीने ‘समाजवाद आणि चीनच्या नव्या युगाची वैशिष्टय़े’ यावर जिनपिंग यांनी मांडलेल्या विचारांना घटनेत सामील करण्याचा प्रस्ताव देखील संसदेत मांडला आहे.

तिसऱयांदा अध्यक्ष होण्याची इच्छा

?जिनपिंग दोन कार्यकाळानंतर देखील अध्यक्ष म्हणून कायम राहू इच्छितात. ऑक्टोबरमध्ये जिनपिंग यांचे सहकारी 69 वर्षीय वांग किशान यांनी पक्षाच्या स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

 ?चीनमध्ये वयाच्या 70 वर्षांनंतर अधिकारी पदावर राहू शकत नाहीत. परंतु राजीनामा दिल्यावर याचवर्षी त्यांना संसद सदस्यत्व देण्यात आले. चीनचे नेतृत्व त्यांना उपाध्यक्षपदी नेमू इच्छित असल्याचे समजते.

Related posts: