|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कट्टर हिंदुत्वाचा अर्थ कट्टर उदारता : भागवत

कट्टर हिंदुत्वाचा अर्थ कट्टर उदारता : भागवत 

मेरठ येथे संघाचे महासमागम आयोजित : शहर झाले भगवेमय

वृत्तसंस्था/  मेरठ

मेरठमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रोदय समागम कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्तीमध्ये कट्टरता, उदारता आणि अहिंसा असावी, असे विधान केले. या कार्यक्रमाद्वारे शक्तिप्रदर्शन केले जात नसून शक्तीची गणना केली जात असल्याचे भागवत यांनी लाखो स्वयंसेवकांना संबोधित करताना म्हटले. क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखले जाणारे मेरठ शहर सुमारे 3 लाख स्वयंसेवकांनी भगवेमय झाले.

भारतात भाषा, संप्रदाय, पूजापद्धती किंवा पंथ वेगळे असून देखील सर्वांचे अस्तित्व आणि धर्म एकच आहे. देशात विविधतेतील एकता असून याचा आपण आदर करतो. कट्टर हिंदुत्वाचा अर्थ कट्टर अहिंसा आणि कट्टर उदारतेशी निगडित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

एक होण्यासाठी एकसारखे व्हावे लागेल असे जगाचे मानणे आहे, परंतु विविधता वेगळी नसल्याचे आमचा देश मानतो. प्राचीन काळापासून हे आमचे घर असल्याने हिंदूंना एक व्हावे लागेल. या देशासाठी आम्ही उत्तरदायी आहोत. भारतीय पूर्वजांचा वंशज असणारा व्यक्ती हिंदू असल्याचे ते म्हणाले.

जीवाचे बलिदान करू

भागवत यांनी 1971 च्या युद्धादरम्यान बांगलादेश सीमेवर पश्चिम बंगालच्या रायगंजमध्ये एका स्वयंसेवकाच्या बलिदानाचा उल्लेख करत देशहितासाठी गरज भासल्यास स्वयंसेवक प्राण देखील देतील असे म्हटले.

भागवत काय म्हणाले…….

?कट्टर हिंदुत्वाचा अर्थ कट्टर सत्य आणि कट्टर धार्मिक व्यक्ती असा होतो.

?आमच्या देशात सर्व जाती आणि हजारो भाषा बोलणाऱयांचा एकच धर्म आहे.

?पूर्ण जगाला वेळोवेळी धर्माची शिकवण आमच्याच देशाने दिली आहे.

?हिंदू असल्यानेच आम्ही एक आहोत, एक असणे म्हणजे एकसारखे असणे नव्हे.

?आमचा देश एक आहे, कारण आम्ही वसुधैव कुटुंबकमचे पालन करतो.

?आम्ही हिंदू अधिक कट्टर झालो, तर आणखीन विविधता सामावून घेऊ.

?आमच्या समुदायातील भांडणाचा लाभ घेणारे जगात अनेक जण आहेत.

?भारतमातेला स्वतःची माता मानणारा देशातील प्रत्येकजण हिंदू आहे.

?देशात असेही हिंदू आहेत, ज्यांना ते हिंदू असल्याचेच ज्ञात नाही.

?देशावर संकट आल्यास स्वयंसेवक जीवाची पर्वा न करता मदतकार्यात स्वतःला झोकून देतात.

?संपूर्ण समाजाला संघाशी जोडून घ्यावे लागेल, तरच समाजाचे कल्याण होऊ शकेल.

Related posts: