|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केरळच्या इस्लामिक उपदेशकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

केरळच्या इस्लामिक उपदेशकाला पोलिसांनी घेतले ताब्यात 

वृत्तसंस्था / हैदराबाद

केरळचा ‘झाकीर नाईक’ या नावाने ओळखला जाणारा इस्लामिक उपदेशक आणि पीस इंटरनॅशनल स्कूलचा संचालक एम.एम. अकबर याला पोलिसांनी हैदराबाद येथे अटक केली आहे.

अकबर ऑस्ट्रेलियातून हैदराबादमध्ये आला होता, तेथूनच तो सोमवारी दोहय़ासाठी रवाना होणार होता, परंतु देश सोडण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अकबर याला हैदराबादहून केरळ येथे नेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

विविध समुदायांमध्ये धर्माच्या आधारावर द्वेष फैलावण्याच्या आरोपांतर्गत कोची येथील त्याची शाळा केरळ सरकारने बंद केली होती. केरळचे 21 जण अफगाणिस्तान आणि सीरियात जाऊन इस्लामिक स्टेटमध्ये सामील झाल्यानंतर अकबर याची ही शाळा चर्चेत आली होती.

दहशतवाद्यांना सामील झालेल्या लोकांमध्ये पीस स्कूलचा कर्मचारी अब्दुल रशीदचा समावेश होता. तोच या गटाचा म्होरक्या होता. रशीदसोबत त्याची पत्नी यास्मीनसोबत देखील बेपत्ता झाली होती, ती या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती.

अकबर हा पीस इंटरनॅशनल स्कूलचा व्यवस्थापकीय संचालक असून केरळच्या विविध जिल्हय़ांमध्ये याच्या 13 शाखा आहेत. या शाळांमध्ये दुसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणाऱया एका पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. या पुस्तकात इस्लामिक रुढिवाद आणि धर्मांतराला बळ देण्याचा पुरस्कार करण्यात आला होता. याप्रकरणी तपास पथकाने 3 जणांना अटक केली होती. 5 ते 13 वर्षांच्या वयोगटातील मुलांना कट्टरवादी विचारांचे शिक्षण देण्याचे लक्ष्य असल्याची कबुली आरोपींनी दिली होती.

Related posts: