|Saturday, July 20, 2019
You are here: Home » leadingnews » श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत आणणार

श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत आणणार 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

बॉलिवूडची ‘चांदनी’ अर्थात श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. शवविच्छेदन अणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर दुबईत होत असलेली कायदेशीर प्रक्रिया रविवारी वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याने अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहे. त्यामुळे आज त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे.

श्रीदेवी यांचे कार्डिऍक अरेस्टमुळे शनिवारी मध्यरात्री दुबईत निधन झाले.ही बातमी मध्यरात्रीच वाऱयासारखी पसरली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबई कधी आणले जणार याचीही चर्चा सुरू झाली. रविवारी रात्री श्रीदेवी यांचे पार्थिव चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत आणले जाईल,असे सुरूवातीला सांगण्यात आले होते.मात्र,त्यांच्या शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर दुबईत होत असलेली कायदेशीर प्रक्रिया रविवारी वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही.त्यामुळे त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहे. त्यानंतरच ते मुंबईत अत्यंदर्शनासाठी आणण्यात येईल,त्यानंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.