|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » विविधा » भारतीयांना नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनच अधिक प्रिय

भारतीयांना नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनच अधिक प्रिय 

ऑनलाईन टीम / मुंबई

मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, आता ते व्यसन बनले असून, भारतीयांना नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनच अधिक प्रिय असल्याची माहिती एका सर्व्हेतून पुढे आली आहे.

भारतातील जवळपास 33 टक्के लोक ज्यांच्यामध्ये तरूणांच्या संख्येचे प्रमाण जास्त आहे आणि ज्या नवयुवकांचा जन्म डिजिटलायझेशनच्या युगात झाला आहे. तेच युवक आपल्या जवळपास असणाऱया लोकांपेक्षा जास्त स्मार्टफोनला महत्त्व देत आहेत. मोटोरोलाच्या सर्वेनुसार भारतात हे प्रमाण सर्वात जास्त असून, भारत यामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचा खुलासा झाला आहे. मोटोरोलाने हा सर्व्हे हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून केला आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यापैकी 50 टक्के लोक हे स्मार्टफोनला आपला बेस्ट प्रेंड असल्याचे सांगत आहेत. आपल्या आयुष्याचा समतोल राखण्याची इच्छा असणाऱयांमध्ये भारत हा क्रमांकात सर्वांत वर आहे. 64 टक्के लोक हे आपले दैनंदिन आयुष्य आणि स्मार्टफेन वापरातील समतोल राखला जावा, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपल्या नातेवाईकांपासून आपण दुरावलो गेलो, अशी कबुली अनेकांनी दिली आहे. यामध्येच जवळपास 50 टक्के लोकांनी हे सकाळी उठल्याबरोबर आपण मोबाईल चेक करतो, असे मान्य केले आहे. या संपूर्ण सर्व्हेमध्ये भारत हा इतर देशांच्या तुलनेत अग्रेसर आहे. 35 टक्के लोक आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये जास्त वेळ खर्च करतो, अशी कबुली दिली आहे. 44 टक्के लोकांनी स्मार्टफोनसाठी कमीत कमी वेळ देणे आपल्या हिताचे असल्याचेही सांगितले आहे.

 

Related posts: