|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » डीएसकेंच्या महागडय़ा गाडय़ा जप्त ; पुणे पोलिसांची कारवाई

डीएसकेंच्या महागडय़ा गाडय़ा जप्त ; पुणे पोलिसांची कारवाई 

ऑनलाईन टीम / पुणे

  गुंतवणूकदरांच्या फसवणुकीच्या प्रकरणात पोलीस कोठडी रवानगी करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या महागडय़ा गाडय़ा पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यात दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्श आणि टोयोटा गाडय़ांचा सामवेश आहे.

  गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी  50 कोटी भरण्यास अपयशी झाल्याने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण हायकोर्टाने काढून घेतल्यानंतर अखेर डीएसकेंना त्यांच्या पत्नीसह अटक करण्यात आले. तुरूंगात रवानगी झाल्यानंतर डीएसकेंची प्रकृती बिघडली होती. ससून आणि दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर डीएसकेंची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर आज पुणे पोलिसांनी  त्यांच्या महागडय़ा गाडय़ा जप्त केल्या आहेत.त्यामुळे डीएसकेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली  आहे.

Related posts: