|Sunday, August 25, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » 65 टक्के भारतीयांना घरच्या दिव्यांची चिंता

65 टक्के भारतीयांना घरच्या दिव्यांची चिंता 

90 टक्के लोकांना हवे आयओटी तंत्रज्ञान; टाटाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

 पुणे/ प्रतिनिधी :

घरापासून दूर असताना 65 टक्के भारतीय घरातील दिवे सुरूच राहिल्याच्या चिंतने ग्रस्त असतात. तर तंत्रज्ञानाच्या मदतीने घराशी जोडलेले राहिल्यास या चिंतेचे सावट दूर होईल, अशी खात्री 90 टक्के लोकांना वाटत असल्याचे निरीक्षण टाटा कम्युनिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ‘इंडिया आयओटी अहवाला’त नोंदविण्यात आले आहे. 

इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे आयओटी तंत्रज्ञानाच्या संकल्पनेबाबत लोकांमध्ये किती माहिती आणि जागरुकता आहे. तसेच या तंत्रज्ञानाच्या रोजच्या जगण्यावर पडणाऱया प्रभावाबद्दल त्यांचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले व त्यासाठी भारतातील 12 शहरांमधल्या 2000 व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या अहवालाच्या निष्कर्षांनुसार, आओटी तंत्रज्ञानामुळे सर्वात मोठा आणि ढळढळीतपणे दिसून येईल, असा लक्षणीय बदल घरगुती स्तरावरच होऊ शकेल, असे लोकांना वाटते. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 90 टक्क्मयांहून अधिक व्यक्तींनी (91.1 टक्के) असे सांगितले, की उपकरणांच्या मदतीने त्यांचे रोजचे जगणे सुलभ झालेले पाहायला त्यांना अधिक आवडेल. घरातील विविध उपकरणांना प्रत्यक्ष त्या-त्या वेळी दूरसंचालित करता आले तर उत्तम, अशी त्यांची धारणा दिसून आली. टाटा कम्युनिकेशन्सचे एक्झेक्मयुटिव्ह व्हाइस प्रेसिडंट सुमीत वालिया यांनी यासंदर्भात माहिती दिली.

आयओटीमध्ये आपल्या जगण्यातील ताणतणाव कमी करण्याची क्षमता आहे. ते उत्पादनक्षमतेला गती देऊ शकते, ऊर्जेच्या वापरामध्ये कपात घडवून आणू शकते, आरोग्यात सुधारणा आणू शकते आणि नवी व्यवसाय पद्धती तयार करू शकते, असे टाटा कम्युनिकेशन्सच्या इंटरनेट ऑफ थिंग्ज विभागाचे प्रमुख आणि वरि÷ उपाध्यक्ष व्ही. एस. श्रीधर यांनी स्पष्ट केले.