|Thursday, April 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मॅक्स डेस्फॉर

मॅक्स डेस्फॉर 

मॅक्स डेस्फॉर हे नाव नव्या पिढीला अपरिचित असू शकेल. मॅक्स हे गेल्या शतकातले गाजलेले छायाचित्रकार होते. दोन शतके पाहिलेल्या या जगप्रसिद्ध छायाचित्रकाराचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 104 वर्षे होते. मॅक्सचा जन्म गेल्या शतकात 1913 साली न्यूयॉर्क येथे ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील रशियन आणि आई ऑस्ट्रीया-हंगेरीतून स्थलांतरित झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर मॅक्स यांनी असोसिएटेड प्रेसमध्ये हरकाम्या दूत म्हणून नोकरीला आरंभ केला. तिथेच त्यांचा मोठा भाऊ फोटो ‘धुणे-छापणे’ या डार्करूमच्या प्रक्रियेचे काम करीत असे. भावाचे पाहून पाहून मॅक्स सर्व कामे शिकले आणि यथावकाश 1938 साली त्यांना तिथेच छायाचित्रकार म्हणून अधिकृत नेमणूक मिळाली.

त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले. मॅक्सनी नौदलात भरती होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची निवड होऊ शकली नाही. पण नौदलासाठी छायाचित्रकार म्हणून त्यांना काम मिळाले. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि विमाने परतली तेव्हाची छायाचित्रे त्यांनी काढली. यानंतर 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानच्या सेनेने शरणागती पत्करली तेव्हाचे युएसएस मिसुरी या युद्धनौकेवरचे छायाचित्रण त्यांना करायला मिळाले. यानंतर त्यांची भारतात बदली झाली. 1946 साली काँग्रेस कमिटीचे अधिवेशन चालू असताना त्यांनी काढलेले पंडित नेहरू आणि गांधीजींचे कृष्णधवल छायाचित्र खूप गाजले. अनेक दशके हे छायाचित्र सरकारी कचेऱया, सार्वजनिक हॉल किंवा अनेक नागरिकांच्या घरात लावलेले आढळून येत असे. गांधीजींचा खून झाला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेचे चित्रण देखील मॅक्सनीच केले होते. कोरियन युद्धाच्या वेळी कम्युनिस्ट सैन्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एका मोडक्मया पुलावरून पलायन करणाऱया नागरिकांच्या छायाचित्राबद्दल त्यांना जागतिक कीर्तीचा ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला. 1983 साली मॅक्सनी पूर्ण निवृत्ती स्वीकारली. 19 फेब्रुवारी 2018 रोजी राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

या ज्ये÷तम छायाचित्रकाराला श्रद्धांजली.

Related posts: