|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पंतप्रधान मोदांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली

पंतप्रधान मोदांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली 

प्रतिनिधी/ पणजी

 पंतप्रधान नरेंद मोदी हे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

 रिपब्लीकन पक्ष गोवा तसेच विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितिच्या संयुक्त विद्यमाने मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या भव्य जाहीर सत्कार  सोहळय़ात ते बोलत होते.

 नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नितीची भुमिका मांडली आहे. भाजपला या समाजाच्या प्रश्नांची जाणीव आहे. आरक्षणावर वादनिर्माण होऊ नये. आरक्षण हे 75 टक्के वाढवावे. सर्व मागासवर्गीय समाजाला आरक्षण दिले पाहिजे आणि मोदी ते करेल असे यावेळी त्यांनी सांगितले. मोदी यांनीं घेतलेल्या नोटाबंदी या यामुळ भ्रष्टाचार कमी झाला आहे. त्यामुळे 2019 मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार आहे, असेही यावेळी आठवले यांनी सांगितले.

 रामदास आठवले हे मंत्री असले तरी त्यांनी लहान समाजाच्या समस्यांना वाचा  फोडली आहे. त्यांनी या समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडले आहे त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आठवले यांचे कार्य हे खूपच चांगले आहे, असे यावेळी खासदार विनय तेंडूलकर यांनीं सांगितले.

 देश हा घटनेचा आधारावर चालत असतो. भाजप सरकार हे सर्वाच्या विकासासाठी काम करत आहे. सर्व समाजाला भाजपने न्याय दिला आहे. रामदास आठवले यांनी मांडल्या त्या समस्या मोदींनी सोडविल्या आहेत. डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांना मोदीनी आचरणात आणले आहे, असे यावेळी खासदार नरेंद सावईकर यांनी सांगितले.

 यावेळी रामदास आठवले व खासदार नरेंद सावईकर यांचा रिपब्लीकन पक्ष गोवा तसेच विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितिच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर युवराज सावंत, सुरेश बारसिंगे, रमाकांत जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिपब्लीकन पक्षाचे  sकार्यकर्ते तसेच लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.