|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » चालू वर्षात 9.4 टक्के वेतनवाढ

चालू वर्षात 9.4 टक्के वेतनवाढ 

वेतनवाढीमध्ये आशिया-पॅसिफिकमध्ये भारत पहिल्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2018 मध्ये भारतीय कर्मचाऱयांच्या सरासरी वेतनामध्ये 9.4 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2017 मध्येही 9.3 टक्के वाढ होईल असे सांगण्यात आले होते. मात्र कंपनीमध्ये गुणवत्तेनुसार काम करणाऱया कर्मचाऱयांच्या वेतनात 15.4 टक्के वाढ होईल असे अंदाज एवॉन हेविटने वर्तविला आहे.

एवॉन हेविटने आपल्या वार्षिक वेतनवाढ सर्वेमध्ये 20 क्षेत्रातील 1 हजार कंपन्यांमध्ये सर्वे केला होता. देशातील कर्मचाऱयांच्या वेतनात यंदा 9.4 ते 9.6 टक्के वाढ करण्यात येईल असे उद्योग क्षेत्राकडून सांगण्यात आले. 2017 मध्ये भारतीय कंपन्यांनी 9.3 टक्के वेतनवाढ दिली होती. वर्षाच्या आधारे देशातील कर्मचाऱयांचे वेतन गेल्या वर्षीप्रमाणेच वाढणार आहे. मात्र आशिया पॅसिफिक भागात भारतातील वाढ ही सर्वाधिक आहे. चीनमध्ये 6.7 टक्के, फिलिपाईन्समध्ये 5.8 टक्के, मलेशिया 5.1 टक्के, सिंगापूर 4 टक्के, ऑस्टेलिया 3.2 टक्के आणि जपानमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय कंपन्यांनी चालू वर्षात कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे म्हटले. संचालकांच्या वेतनात 9.2 टक्के, मध्यम अधिकारी 9.7 टक्के, कनिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनाच्या वेतनात 10 टक्के, आणि कार्यालयीन कामकाज पाहणाऱया कर्मचाऱयांच्या वेतनात 9.9 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. जीएसटीसंबंधित क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांचा सोन्याचे दिवस येणार आहेत.

व्यावसायिक सेवा देणाऱया क्षेत्रात 10.6 टक्के, ग्राहक इंटरनेट कंपनी क्षेत्रात 10.4 टक्के, आयुष्य विज्ञानमध्ये 10.3 टक्के, ग्राहक उत्पादने 10.2 टक्के, वाहन उत्पादन क्षेत्रात 10.1 टक्के वेतनवाढ होण्याचा अंदाज आहे.

इंजिनिअरिंगला फटका…

देशातील काही क्षेत्रात 9 टक्क्यांपेक्षा कमी वेतनवाढ होण्याचा अंदाज आहे. यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये 8.9 टक्के, आर्थिक सेवा संस्था 8.5 टक्के, सिमेंट क्षेत्रात 8.4 टक्के वेतनवाढ होण्याचा अंदाज आहे. 

Related posts: