|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अभ्यासकरता स्वतःच्या मुलावरच अत्याचार

अभ्यासकरता स्वतःच्या मुलावरच अत्याचार 

तेलंगणातील प्रकार : समाजमाध्यमांवर संताप

वृत्तसंस्था/ भद्राचलम

 तेलंगणात एका पित्याने शिक्षणावरून स्वतःच्या मुलाचे शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सहावी इयत्तेत शिकणारा मुलगा शाळेत जात नसल्याने वडिलांनी त्याला भरदुपारी वीजेच्या खांबाला बांधल्याचा प्रकार घडला आहे.

ही घटना तेलंगणाच्या भद्राचलम जिल्हय़ात घडली असून पित्याद्वारे मुलाला उन्हात वीजेच्या खांबाला बांधल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे. समाजमाध्यमांवर याप्रकरणी लोकांनी संबंधित पित्याच्या विरोधात कठोर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पित्याच्या रागाचा बळी ठरलेल्या मुलाचे नाव ‘गोला’ असून तो आदिवासी समुदायाचा आहे. गोला कमलापूर येथील आदर्श माध्यमिक शाळेत सहावीच्या इयत्तेत शिकतो. परंतु मागील एक आठवडय़ापासून तो शाळेत जात नव्हता. गोला एक आठवडय़ापासून शाळेत जात नसल्याचे आणि यापुढे त्याला शिकायची इच्छा नसल्याचे कळल्यावर त्याचे वडिल संतापले. संतापाच्या भरात त्यांनी मुलाला घरानजीकच्या वीजेच्या खांबाला बांधले, दुपारभर गोला खांबाला बांधलेल्या अवस्थेतच राहिला.  स्थानिक पोलिसांनी गावात जाऊन घटनेची माहिती घेतली.

Related posts: